भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (06 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील आपला दुसरा सामना 6 विकेट्सने गमावला. हा सामना भारतासाठी करा अथवा मरा परिस्थितीचा सामना होता. परंतु या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 173 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाने 1 चेंडू शिल्लक असताना सामना खिशात घातला. या पराभवासह भारताचे आशिया चषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. भारताच्या पराभवानंतर अनेक चाहते कर्णधार रोहित शर्माला लक्ष करत आहेत. रोहित हा सातत्याने चुका करत असल्याचे म्हटले जाते.
ज्या मुद्द्यावरून रोहित शर्माच्या नेतृत्वावर सर्वाधिक प्रश्न उपस्थित होत आहेत तो मुद्दा म्हणजे रिषभ पंतला वारंवार संधी देण्याचा. भारतीय संघाने साखळी फेरीनंतर सुपर फोरमध्ये दोन्ही सामन्यात रिषभला मैदानात उतरवले. मात्र, दोन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. त्याचवेळी दिनेश कार्तिक हा चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही, त्याला वारंवार डावलले जाते, यावर चाहत्यांनी बोट ठेवले.
या सर्व प्रकरणातील दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय संघाची न ठरलेली बॅटिंग लाईन अप. सध्या भारतीय संघाच्या बॅटिंग लाइन अपमध्ये पहिले चार क्रमांक स्थिर दिसतात. कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली व सूर्यकुमार यादव हे पहिल्या चार क्रमांकावर खेळतील. मात्र, त्यानंतर कोणाचाही फलंदाजी क्रमांक निश्चित नाही. श्रीलंकेविरुद्ध रिषभ की हार्दिक या विवंचनेत संघ व्यवस्थापन असल्याचे दिसले.
यासोबतच गोलंदाजीत दीपक हुडाच्या रूपाने पर्याय शिल्लक असताना त्याला गोलंदाजी न देता मधल्या षटकात भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी देण्यावरून देखील रोहितवर टिका होतेय. तसेच रविचंद्र अश्विन याला उशिरा गोलंदाजीसाठी पाचारण केल्याने भारतीय संघ दबाव बनवू शकला नाही असे देखील मत काहींनी व्यक्त केले आहे. चांगली कामगिरी केल्यानंतरही युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याला संघाबाहेर केल्यावरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
भारतातील ‘या’ मैदानातील स्टँडला दिले भज्जी अन् युवीचं नाव! वाचा सविस्तर
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा