जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी खास ठरत आहे. तो पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यावेळी तो शतक ठोकण्यास चुकला. पॅट कमिन्स याने रहाणेला 89 धावांवर असताना तंबूचा रस्ता दाखवला. गलीवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या कॅमरून ग्रीन याने रहाणेचा अफलातून झेल पकडला. यावेळी रहाणेलाही विश्वास बसला नाही. यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात डब्ल्यूटीसी अंतिम सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 26वे अर्धशतक झळकावले. यासोबतच त्याने कसोटीतील 5000 धावाही पूर्ण केल्या. सामन्यादरम्यान त्याला पॅट कमिन्स याच्या षटकात एक जीवनदानही मिळाले होते. त्या संधीचे त्याने सोने केले आणि विक्रमांचे मनोरे रचले. विशेष म्हणजे भारताने लंच ब्रेकपर्यंत फक्त एक विकेट गमावली होती.
https://www.instagram.com/reel/CtRRuBlttMr/?utm_source=ig_embed&ig_rid=37df2f0e-54ae-4468-ad1b-b9e26e4103cf
ग्रीनने पकडला शानदार झेल
लंच ब्रेकनंतर शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीला आले. यावेळी दुसऱ्या षटकातच भारताला मोठा धक्का बसला. पॅट कमिन्स याने रहाणेला वैयक्तिक 89 धावांवर बाद केले. गलीमध्ये उभ्या असलेल्या कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने शानदार झेल पकडला. खरं तर, कमिन्सने गुड लेंथ चेंडू टाकला होता, ज्यावर रहाणेने थर्डमॅनच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू गलीमध्ये उभ्या असलेल्या ग्रीनने उजव्या बाजूला डाईव्ह मारत शानदार पद्धतीने पकडला.
भारताने पहिल्या डावात केल्या 296 धावा
रहाणे बाद होण्यापूर्वी त्याने शार्दुल ठाकूर याच्यासोबत सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारताने फॉलोऑनचा धोका टाळला. भारताचा पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. तसेच, ऑस्ट्रेलियाने 173 धावांची आघाडी घेतली. (wtc 2023 final all rounder cameron green takes stunning one handed catch of ajinkya rahane in wtc final)
महत्वाच्या बातम्या-
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
चुकीला माफी नाही!! कर्णधार कमिन्सच्या ‘त्या’ दोन चुका भारताच्या पथ्यावर, कांगारुंच्या धावांचा डोंगर पोखरला