भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलमधील संतुलन बिघडले आहे. एका बाजूला, दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे जो डब्ल्यूटीसी अंतिम फेरीसाठी पात्र होण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. तर दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत जे दुसऱ्या स्थानासाठी एकमेकांशी झुंजत आहेत. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, टीम इंडियासाठी ही शेवटची मालिका आहे, भारताला अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी जे गुण गोळा करायचे आहेत ते सर्व या मालिकेतच जमा करायचे आहेत. तर ऑस्ट्रेलियाची श्रीलंकेविरुद्धची मालिका बाकी आहे. अशा स्थितीत बॉर्डर गावस्कर मालिका संपल्यानंतरही त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी असेल.
गब्बा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारत WTC फायनलसाठी कसा पात्र ठरू शकतो यावर एक नजर टाकूया.
3-1: टीम इंडियाने पुढील दोन सामने जिंकून मालिका जिंकली तर कोणाच्याही मदतीशिवाय फायनलमध्ये प्रवेश करेल. या स्कोअरलाइननंतर भारताची विजयाची टक्केवारी 60.53 होईल. यानंतर ऑस्ट्रेलियानेही श्रीलंकेला मालिकेत 2-0 ने पराभूत केले तरी त्यांच्या खात्यात केवळ 57.02 टक्के गुण होतील.
2-1: जर टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना अनिर्णित राहिला, तर त्यांच्या खात्यात 57.02 टक्के गुण असतील. जे ऑस्ट्रेलिया श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवून पार करू शकेल. श्रीलंकेचा क्लीन स्वीप केल्यानंतर ऑस्ट्रेलिया 58.77 च्या विजयाच्या टक्केवारीसह भारताला मागे टाकेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेने किमान एक सामना अनिर्णित ठेवावा किंवा दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानकडून किमान 0-1 असा पराभव व्हावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.
2-2: भारत आणि ऑस्ट्रेलियाने उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकल्यास भारताचे 55.26 टक्के गुण होतील. या प्रकरणात, भारताला WTC फायनलसाठी पात्र होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला किमान 1-0 च्या फरकाने श्रीलंकेकडून हार पत्करावी लागेल किंवा दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानकडून 2-0 ने पराभूत व्हावे लागेल.
1-1: मालिकेतील पुढील दोन सामने देखील अनिर्णित राहिले, तर भारत 53.51 टक्के गुणांसह या सर्कलचा शेवट करेल. अशा स्थितीत डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला प्रार्थना करावी लागेल की पाकिस्तानने दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे किंवा श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत करावे किंवा दोन्ही सामने अनिर्णित राहवे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका 0-0 असा संपला तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे समान 53.51 टक्के गुण असतील. पण अधिक मालिका विजयांमुळे (ऑस्ट्रेलियाच्या दोनच्या तुलनेत तीन) भारत या चक्रात पुढे असेल. मात्र, श्रीलंकेने 2-0 असा विजय मिळवल्यास ते भारताला मागे टाकून अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल.
1-2: भारताने मालिका गमावल्यास संघाच्या खात्यात 51.75 टक्के गुण शिल्लक राहतील. ज्यामुळे भारत WTC च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर होईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्या उर्वरित सर्व कसोटी गमावल्या तरी ते भारताच्या पुढेच राहतील.
हेही वाचा-
या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार
BGT 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये 2 भारतीय
R Ashwin Retirement; अनोखा योगायोग, अनिल कुंबळेच्या शैलीत अश्विनची निवृत्ती!