इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला अनेकजण गमतीने ज्योतिषी म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे अनेक वर्तमानातील घटनांशी जुळणारे त्याचे अनेक जुने ट्वीट वायरल होत असतात. त्याच्या जुन्या ट्वीटवरून बर्याचवेळा खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा विराट कोहलीबद्दल आर्चरचे जुने ट्वीट व्हायरल होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पाऊसामुळे रद्द करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीची खेळी भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पण शुक्रवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. पण शनिवारी नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांनी योग्य सिद्धही केला. त्यांनी भारतीय संघाला केवळ २१७ धावांमध्ये सर्वबाद केले. भारतासाठी विराट आणि अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. परंतु, एकही खेळाडूला अर्धशतक करता आले नाही.
दुसर्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा विराट ४४ धावांवर नाबाद होता. अशा परिस्थितीत तो तिसऱ्या दिवशीही भारतीय संघाची फलंदाजी सांभाळेल अशी अपेक्षा होती. पण, तिसऱ्या दिवशी सुरुवातीलाच एकही धाव न जोडता तो ४४ धावांवर काईल जेमिसनने त्याला बाद केले.
पण विराट बाद होण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आर्चरने ५ वर्षांपूर्वीचे ट्वीट व्हायरल झाले होते. त्याने ५ वर्षांपूर्वी ट्वीट केले होते की ‘ विराट, आज तुझा दिवस आहे.’
Today is your day virat
— Jofra Archer (@JofraArcher) March 31, 2016
काईल जेमीसनचा भारतीय संघावर हल्ला बोल
काईल जेमीसनने पाच विकेट्स घेत भारताचा पहिला डाव २१७ धावांत गुंडाळला. जेमीसनने २२ षटकांत ३१ धावा देत या पाच विकेट्स घेतल्या. जेमीसनशिवाय ट्रेंट बोल्ट आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याच्यानंतर कर्णधार कोहलीने ४४ धावा केल्या.
तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर न्यूझीलंडने दोन गडी गमावून १०१ धावा केल्या होत्या. टॉम लाथमने ३० आणि डेव्हन कॉनवेने ५४ धावा केल्या. केन विलियम्सन १२ धावांवर नाबाद खेळत आहे . भारतासाठी रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा दोघांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या
पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान
दु:खद! ‘द ग्रेट खली’च्या जिवलग व्यक्तीचे निधन, दीर्घ आजारामुळे मालवली प्राणज्योत
‘मूड स्विंग झाला, पण चेंडू नाही’; टिम इंडियाच्या सुमार गोलंदाजीवर माजी क्रिकेटर नाराज