---Advertisement---

WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

On: शुक्रवार, जून 18, 2021 7:30 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघात खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना खेळवला जाईल. आजपासून या सामन्याला सुरुवात होणार होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सामना सुरू होणे अपेक्षित होते.

मात्र साऊथम्पटन मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे पहिले सत्र आणि दुसरे सत्र वाया गेले होते. मात्र अजूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात येत असल्याचा घोषणा करण्यात आली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1405884532323201031?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1405884532323201031%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fwtc-final-play-called-of-on-day-1%2F

मात्र आता पावसाने हजेरी लावल्याने आयसीसीने त्यासाठी तयार केलेला राखीव दिवसाचा नियम लागू झाला आहे. ज्यामुळे वाया गेलेल्या सत्रांचा खेळ भरून काढता येणार आहे. आयसीसीने साऊथॅम्प्टन मधील यापूर्वीच पावसाची भीती लक्षात घेऊन राखीव दिवसाचा नियम लागू केला होता. त्यामुळे १८ ते २२ जून दरम्यान हा सामना खेळवला जाणार असला, तरी आयसीसीने २३ जून हा सहावा दिवस देखील काही वेळ वाया गेल्यास सामन्यासाठी निर्धारित केला होता. आता पहिल्या दिवसाचे दोन सत्र वाया गेल्याने हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे सहाव्या दिवशी म्हणजेच २३ जूनला देखील आपल्याला हा सामना पाहायला मिळू शकतो.

यातील आनंदाची बाब म्हणजे या तरतुदीमुळे अद्याप सामन्याच्या एकाही षटकाचे नुकसान झाले नाही आहे. परिस्थिती सुधारल्यास संपूर्ण पाच दिवसांचा खेळ होणे, अद्यापही शक्य आहे. त्यामुळे चाहत्यांचे आता साऊथॅम्प्टन मधील पुढील घडामोडींवर लक्ष असेल.

महत्वाच्या बातम्या:

WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ही तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ

भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव

वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---