आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. सन 2013नंतर भारताने आजपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा जागा बनवल्यानंतर चाहत्यांना आशा होती की, भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा 10 वर्षांचा वनवास संपवेल. मात्र, ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभूत करत भारताच्या आणि चाहत्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारताच्या पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
लंडनच्या के ओव्हल मैदानात डब्ल्यूटीसी अंतिम सामना पाहण्यासाठी गेलेल्या रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी भारताच्या पराभवानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही या सामन्याच्या पहिल्या दिवशीच हारलो होतो. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या हेड आणि स्मिथमधील मोठ्या भागीदारीने सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर निर्माण केले. जर तुम्ही खेळाची ही भागीदारी हटवली, तर सामना तुम्हाला पूर्णपणे बरोबरीत दिसेल.”
पुढे बोलताना बिन्नी म्हणाले की, “या पराभवानंतरही आपल्याला आत्मविश्वास कमी होऊ नाही दिला पाहिजे. भविष्यात आपल्यापुढे अनेक मोठ्या स्पर्धा आहेत, ज्यामध्ये वनडे विश्वचषकही मायदेशात होणार आहे. याबाबत आपल्याला सातत्याने चांगली तयारी करायची आहे.”
अंतिम सामन्यात भारताचे खराब प्रदर्शन
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाचे सर्व विभागात खराब प्रदर्शन राहिले. गोलंदाजीत जिथे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 469 धावांचा डोंगर उभारू दिला. तसेच, फलंदाजीत भारत पहिल्या डावात फक्त 296 धावांवर सर्वबाद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडी मिळाली होती.
भारतीय संघाच्या या सामन्यात जर कोणती सकारात्मक गोष्ट राहिली असेल, तर ती अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे लाजवाब प्रदर्शन. त्याने पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावा आणि दुसऱ्या डावात 46 धावांचे योगदान दिले. रहाणेच्या पहिल्या डावातील धावांच्या जोरावर भारतीय संघ फॉलोऑन टाळण्यात यशस्वी झाला होता. (wtc final 2023 bcci president roger binny on indias defeat against australia)
महत्वाच्या बातम्या-
‘विराटने भारतासाठी जे काही केले…’, WTC Finalनंतर कोहलीविषयी गंभीरची सर्वात मोठी प्रतिक्रिया
IND vs AUS : कोच द्रविडने ‘या’ खेळाडूंवर काढला राग, सामना हारण्यामागील मोठ्या कारणाचाही केला खुलासा