सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. हा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आता बीसीसीआयने भारतीय संघासोबत आणखी 5 राखीव खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरफराज खान याच्या नावाचाही समावेश आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन करण्याव्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतकही ठोकले आहे.
माध्यमांशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), ईशान किशन (Ishan Kishan), नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) यांना राखीव खेळाडू म्हणून संघाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ अनेक सराव सामने खेळणार आहे. यासाठी आयपीएल प्ले-ऑफमधून बाहेर होणाऱ्या संघांचे खेळाडू आधी इंग्लंडला रवाना होतील.
हाती आलेल्या वृत्तांनुसार, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत चर्चा केल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघात जागा दिली. रहाणेला 15 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात जागा मिळाली. आयपीएल 2023मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी केली. एका सामन्यात त्याने 19 चेंडूत अर्धशतकही झळकावले होते.
Ruturaj, Sarfaraz Khan, Ishan Kishan, Mukesh Kumar & Saini likely to be the stand-by of the Indian team for the WTC final. [TOI]
— Johns. (@CricCrazyJohns) April 27, 2023
मागील काही काळापासून 25 वर्षीय सरफराज खान याला भारतीय संघात घेण्याची मागणी केली जात आहे. त्याने 37 प्रथम श्रेणी सामन्यात 80च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. त्यात 13 शतके आणि 9 अर्धशतकांचाही समावेश आहे. यामध्ये त्याने नाबाद 301 धावांची मोठी खेळीही साकारली आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये सलग 3 हंगामात धावांचा पाऊस पाडत आहे.
दुसरीकडे, ईशान किशन याच्याबद्दल बोलायचं झालं, तर मागील काही दिवसांपूर्वी वनडेत द्विशतक झळकावले होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 48 सामन्यात 39च्या सरासरीने 2985 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 6 शतके आणि 16 अर्धशतक ठोकले आहेत. 273 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत जागा मिळाली होती. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
दुसरीकडे, ऋतुराज गायकवाड याच्या कामगिरीबद्दल जाणून घ्यायचं झालं, तर मागील काही दिवसांपूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या एका सामन्यातील एका षटकात 7 षटकार मारले होते. तसेच, त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहे. त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 28 सामन्यात 42च्या सरासरीने 1941 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 195 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच, तो आयपीएल 2023 स्पर्धेतही चेन्नईसाठी शानदार कामगिरी करत आहे. (wtc final cricketer sarfaraz khan ruturaj gaikwad ishan kishan and 2 others standbys team india ind vs aus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डब्ल्यूटीसी फायनलसाठी गावसकरांनी निवडली भारताचा प्लेइंग इलेव्हन! 5 फलंदाज आणि 3 गोलंदाजांना संधी
पंजाबचा ‘हा’ खेळाडू WTC फायनलमध्ये ठरू शकतो पंतचा चांगला पर्याय, इंग्लंडच्या दिग्गजाने सांगितले नाव