इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा संपल्यानतर क्रिकेटप्रेमी एका मोठ्या सामन्याची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत. तो सामना म्हणजेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना होय. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी निवडलेले अधिकतर भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले असून सराव करत आहेत.
अशातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) याने विराट कोहली आणि मोहम्मद सिराज ((Virat Kohli And Mohammed Siraj) यांच्याविषयी खास बाब बोलून दाखवली. खरं तर, हे तिन्ही खेळाडू आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळतात. मात्र, दुखापतीमुळे हेजलवूड आयपीएलमधील काही सामनेच खेळू शकला. या हंगामात हेजलवूडने आरसीबीसाठी फक्त 3 सामने केळले.
हेजलवूडने केली विराटची प्रशंसा
हेजलवूड याने विराट कोहली (Virat Kohli) याची प्रशंसा करत म्हटले की, “भारतीय सुपरस्टारची काम करण्याची पद्धत त्याला इतका मोठा खेळाडू बनवते, जो खरोखरच आहे. तो सरावादरम्यान खूप मेहनत घेतो, ज्यामुळे तो एक शानदार फलंदाज आणि एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “सरावादरम्यान तो सर्वात आधी मैदानावर येतो आणि सर्वात शेवटी मैदानातून बाहेर पडतो. तसेच, तो पूर्ण ऊर्जेसोबत सराव करतो. याव्यतिरिक्त तो इतर खेळाडूंनाही प्रेरित करतो.”
मोहम्मद सिराजबद्दल काय म्हणाला?
हेजलवूडने मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “या आयपीेल हंगामात आरसीबीसोबत खूप उशिरा जोडलो गेलो, पण या हंगामाच्या सुरुवातीपासूनच तो खूप आक्रमक गोलंदाजी करत होता. तो सातत्याने विकेट्स घेण्यासाठी गोलंदाजी करत होता. त्याने चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये शानदार इकॉनॉमीने गोलंदाजी केली. त्याने या मैदानात 6 आणि 6.5च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली.”
‘डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी उत्सुक’
दुखापतीतून सावरत असलेल्या हेजलवूडने इंग्लंडमध्ये सराव करताना म्हटले की, डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्यापूर्वी त्याला खूपच चांगले वाटत आहे. तो म्हणाला, “सध्या मी पूर्णपणे फिट आहे. शक्य आहे की, आमचा संघ आणखी 3-4 हंगामात सराव करेल.”
खरं तर, हेजलवूडने भारताविरुद्ध 15 कसोटी सामने खेळले आहेत. तो म्हणाला की, “मी भारताविरुद्ध अनेक कसोटी सामने खेळलो आहे. त्यामुळे आगामी डब्ल्यूटीसी अंतिम सामना खूपच चांगला होणार आहे.”
हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. (wtc final cricketer virat kohli batting impresses australia pacer josh hazlewood ahead of wtc final 2023 RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलपूर्वीच टीम इंडियाला घाबरला स्टीव्ह स्मिथ! म्हणाला, ‘जे भारतात झालं, तेच…’
आयपीएल फायनलनंतर कशी सरली मोहित शर्माची रात्र? जे काही म्हणाला, त्याने तुम्हीही व्हाल भावूक