भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यास आता फक्त 1 दिवस शिल्लक आहे. 7 जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांकडून मोठमोठ्या प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचीही प्रतिक्रिया आली आहे. राहुल द्रविडने डेविड वॉर्नरविषयी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेने अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. कारण, हा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याच्या बॅटमधून मागील काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडलेला नाहीये. भारत दौऱ्यावरही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर त्याला संघातून वगळण्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, निवडकर्त्यांनी त्याला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात आणि ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात कायम ठेवले. असे असले, तरीही ऍशेसमध्ये सलामीला डावाची सुरुवात करण्यासाठी त्याला भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात दम दाखवावा लागेल. डाव्या हाताचा फलंदाज लाल चेंडूविरुद्ध संघर्ष करतोय, पण राहुल द्रविड (Rahul Dravid) याला असं वाटतंय की, वॉर्नरला बाद करणे सोपी गोष्ट नाहीये.
अंतिम सामन्याच्या दोन दिवस आधी सोमवारी (दि. 05 जून) झालेल्या पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाला की, “वॉर्नर एक शानदार खेळाडू आहे. त्याला बाद करणे तितके सोपे नाहीये की, तुम्ही फक्त राऊंड द विकेट गोलंदाजी करून बाद कराल. जर हे इतके सोपे असते, तर तो इतका वेळ खेळू शकला नसता.”
पुढील वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान कसोटीतून निवृत्ती घेऊ शकतो वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज वॉर्नरने नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध सिडनीत खेळला जाणारा सामना त्याचा शेवटचा कसोटी सामना असू शकतो. मात्र, त्याने अद्याप इतर क्रिकेट प्रकारातील निवृत्तीविषयी कोणताही खुलासा केला नाहीये. तसेच, तो म्हणाला आहे की, त्याला 2024मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळायचे आहे. (wtc final indian head coach rahul dravid statement on david warner read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा स्मिथ WTC फायनलपूर्वी चिंतेत; म्हणाला, ‘होय, मला टेन्शन…’
अजिंक्य रहाणे बर्थडे स्पेशल: अशी आहे ‘कूल’ अज्जूची ‘ऑर्कुटवाली’ लव्हस्टोरी, वाचायलाच हवी






