विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव २१७ धावांवर संपुष्टात आला आहे. एकीकडे न्यूझीलंड संघातील गोलंदाजांना गडी बाद करण्यात यश आले होते. तर भारतीय गोलंदाजांना गडी बाद करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी विराटसेनेने न्यूझीलंडच्या फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचा मार्ग अवलंबला.
न्यूझीलंड संघाच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय संघाला धावांचा डोंगर उभारण्यात अपयश आले. परंतु न्यूझीलंड संघातील फलंदाज संपूर्ण नियंत्रणात दिसून येत होते. सलामीवीर डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम भारतीय गोलंदाजांपुढे टिच्चून फलंदाजी करताना दिसले. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज शुबमन गिल यांनी स्लेजिंग करायला सुरुवात केली.
यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कर्णधार कोहली कॉनवेची एकाग्रता भंग करण्यासाठी जसप्रीत बुमराहची मदत घेताना दिसून येत आहे. तो कॉनवेच्या जवळ जाऊन बूम-बूम असे बोलताना दिसून येत आहे. जर त्याला बुमराहला चियर करायचे होते, तर तो हिंदीमध्ये बोलू शकला असता. परंतु तो मुद्दाम कॉनवेच्या जवळ जाऊन इंग्लिशमध्ये बोलत होता. परंतु याचा काही फायदा झाला नाही. कारण कॉनवेने या डावात अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. (WTC final : Indian team sledging video)
https://twitter.com/pant_fc/status/1406614135085797384?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406614135085797384%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fwtc-sledging-video-new-zealand%2F
न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत
कॉनवे आणि लेथम यांनी या सामन्यात न्यूझीलंड संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ३४ षटके फलंदाजी केली. त्यानंतर लेथम ३० धावा करत माघारी परतला. तर चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या कॉनवेने या सामन्यात देखील अर्धशतक झळकावले. परंतु त्याला मोठी खेळण्यास अपयश आले. तो ५४ धावा करत माघारी परतला. आता न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन नाबाद १२ धावांवर फलंदाजी करत आहे. तर रॉस टेलर नाबाद ० धावांवर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंड संघाला २ बाद १०१ धावा करण्यात यश आले आहे.
महत्वाच्या बातम्या
सलग तीन डावांत शतक, अर्धशतक व शून्य धावेवर बाद होणारा ‘तो’ ठरला पहिला क्रिकेटर
जाळ अन् धूर संगटच! स्म्रीतीच्या फोटोवर कोट्यावधी चाहते घायाळ; म्हणे, ‘अभिनेत्रीहूनही सुंदर’
‘इंग्लंडच्या खेळाडूंनी हात धुवून डिवचलं, पण मला फरक पडला नाही,’ भारताच्या अष्टपैलूची प्रतिक्रिया