---Advertisement---

WTC Final, INDvsNZ: अखेर पावसाने मारली बाजी, चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द

On: सोमवार, जून 21, 2021 7:44 PM
---Advertisement---

साऊथॅम्पटन।  भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी चौथा दिवस होता. मात्र, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीच साऊथॅम्पटनमध्ये पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाची सतंतधार सुरु असल्याने अखेर या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळ सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे चौथ्या दिवसाच्या खेळाला उशीरा सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, पावसाची थांबण्याची चिन्हे दिसेनाशी झाली. ग्राऊंड्समनही मैदानातील पाणी काढण्याचा प्रयत्न करत होते. पण, अखेर चौथ्या दिवशी कोणताही खेळ होऊ शकत नसल्याचे दिसले.

यापूर्वी या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळही पावसामुळे झाला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ झाला. तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 49 षटकात 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन (12) आणि रॉस टेलर (0) नाबाद आहेत. तर डेवॉन कॉनवे 54 धावांवर आणि टॉम लॅथम 30 धावांवर बाद झाला आहे.

तत्पूर्वी, भारताने या सामन्यात पहिल्या डावात सर्वबाद 217 धावा केल्या आहेत. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर विराटने 44 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा 34, शुबमन गिल 28 आणि आर अश्विनने 22 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने 31 धावांत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---