भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. मैदानाबाहेर आपल्या स्टाईलिश लूक्स आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट, मैदानात नेहमीच आक्रमक भूमिकेत दिसून आला आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला होता. जेव्हा कोहली चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा करताना दिसून आला होता. काय होते यामागील कारण? याचा खुलासा न्यूझीलंड संघाचा गोलंदाज निल वॅगनरने केला आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज वॅगनरने कोहलीबद्दल मोठा खुलासा केला. कोहली लाईव्ह सामन्यात अनेकदा न्यूझीलंडच्या समर्थकांकडे पाहून तोंडावर बोट ठेऊन, शांत बसा असा इशारा करताना दिसून आला होता.
त्याने हा इशारा का केला असावा? याचा खुलासा करत निल वॅगनरने म्हटले की, “न्यूझीलंड संघाचे समर्थक एक गाणे गात होते. ते सतत एकच गाणे गात होते .त्या गाण्याचे बोल ‘इन युवर हेड कोहली, इन युवर हेड..’ असे होते. न्यूझीलंडचे समर्थक कोहलीला उकसवण्यासाठी आणि राग आणण्यासाठी असे करत होते. कोहली देखील त्यांना शांत करण्यासाठी काही-ना-काही प्रत्युत्तर देत होता. यादरम्यान त्याने अनेकदा तोंडावर बोट ठेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर समर्थकांनी डेवोन कॉनवेला समर्थन करायला सुरुवात केली होती.” (WTC final : Neil Wagner reveals what made Virat Kohli attempt shush crowd)
???? ???? ???? ???? ???? ????
The many faces of Virat Kohli!
Which one will we have at the end of play today? ????#WTC21 Final | #INDvNZ pic.twitter.com/Y0USGOFuhg
— ICC (@ICC) June 23, 2021
भारतीय कर्णधार विराट कोहली हा न्यूझीलंडविरद्ध अंतिम सामन्यादरम्यान देखील उत्साहात दिसून आला होता. भारतीय गोलंदाजांना जेव्हा गडी बाद करण्यात यश येत होते, तेव्हा तो त्याचा जल्लोष साजरा करताना दिसून येत होता. आयसीसीने त्याचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सामना सुरू असतानाची विराटची अनेक रूपे दाखवण्यात आली आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या-
पुजाराच्या सुमार फलंदाजीने संघ व्यवस्थापनाला विचार करण्यास पाडले भाग, इंग्लंडविरुद्ध मिळणार डच्चू!
‘आमचं यशचं इतके मोठे आहे, विमानतळावर पोलिसही WTC गदासोबत फोटो घेऊ इच्छित होते’
‘मिशन इंग्लंड’ फत्ते करण्यासाठी विराटसेनेत होणार महत्त्वपुर्ण बदल, ‘असा’ असेल अंतिम ११ जणांचा ताफा






