विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला दोन्ही डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. परिणामी भारतीय संघाला कमी धावसंख्येवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघात स्थान मिळेल की नाही? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला येत्या ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापक पुजाराऐवजी केएल राहुल किंवा हनुमा विहारीला संघात स्थान देऊ शकतात. पुजाराने सुरुवातीपासून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. भारतीय संघाला यश मिळवून देण्यात चेतेश्वर पुजाराने मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि गेल्या काही सामन्यांत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. (Indian team management thinking to drop cheteshwar pujara from test series against England, after poor performance in WTC)
जानेवारी २०२० नंतर चेतेश्वर पुजाराची कामगिरी पाहिली तर त्याचा स्ट्राइक रेट ३०.२० आहे. यादरम्यान ७७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. ही खेळी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीच्या मैदानावर खेळली होती. त्याची निराशाजनक कामगिरी पाहता, इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याला संघाबाहेर राहावे लागू शकते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.
चेतेश्वर पुजाराला गेल्या ३० डावात एकही शतक झळकावता आले नाही. तसेच जानेवारी २०२० नंतर त्याची फलंदाजी सरासरी २६.३५ इतकी आहे. तो अधिकतर जास्त रक्षात्मक फलंदाज असल्यामुळे गोलंदाजाला पुनरागमन करण्याची संधी मिळत असते. शेवटचे शतक झळकावल्यानंतर त्याने ९ वेळेस १० पेक्षा कमी धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्ययस्थापक दुसऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकते. भारतीय संघाकडे केएल राहुल आणि हनुमा विहारी सारखे फलंदाज आहेत. जे संघासाठी उत्कृष्ट खेळी करू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
‘मिशन इंग्लंड’ फत्ते करण्यासाठी विराटसेनेत होणार महत्त्वपुर्ण बदल, ‘असा’ असेल अंतिम ११ जणांचा ताफा
जगात ५१०० क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
पराजयानंतर नेतृत्त्वपद सोडा कोहलीला WTC प्लेइंग XIमध्येही मिळाली नाही जागा, पाहा संपूर्ण संघ






