विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा राखीव दिवशी (२३ जून) निकाल लागला. मागील दोन वर्षांपासून चालत आलेल्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने बाजी मारली. ८ विकेट्सने भारतीय संघाला पराभवाचे तोंड दाखवत न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटचा किंग झाला. दरम्यान न्यूझीलंडच्या हातून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे.
न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला हरवून आयसीसीच्या स्पर्धेत आपले वर्चस्व कायम ठेवलेच. सोबतच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही आपला धाक कायम राखला.
या ऐतिहासिक विजयामुळे न्यूझीलंड संघाने आपले आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. याबरोबरच त्यांचा खात्यात अजून ३ गुणांची भर झाली असून त्यांचे गुण आता १२६ झाले आहेत. तसेच भारतीय संघाला या पराभवाची किंमत चुकवावी लागली. भारतीय संघाला १ गुणाचा तोटा झाला असून भारतीय संघाचे गुण आता १२० आहेत. भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आता दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ विश्व कसोटीचा अंतिम सामना जिंकली असती तर, भारतीय संघ आज कसोटीत पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर असता.
कोहलीने भारतीय संघासाठी आजवर ६१ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये ३६ वेळा भारतीय संघ जिंकला आहे आणि १५ वेळा पराभूत झाला आहे.तसेच त्याने ९५ एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करताना ६५ सामने जिंकले आहे आणि २७ वेळा पराभूत झाला आहे. टी-२०मध्ये सुद्धा कोहलीचा कर्णधारपदाचा विक्रम चांगला आहे. कोहलीने ४५ टी-२० सामन्यात आजवर नेतृत्व केला आहे. ज्यामध्ये त्याला २७ सामन्यात विजय मिळाला आणि १४ वेळा पराभव झाला.
परंतु, आजवर कोहलीने एकही आयसीसीची स्पर्धा जिंकली नाही आहे. कोहली एक यशस्वी कर्णधार असून सुद्धा त्याचा नशिबी अजून आयसीसीची ट्रॉफी नाही आली.
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक
‘दादा’चे नव्या क्षेत्रातील पदार्पण टीम इंडियासाठी ठरलंय अनलकी, गमावल्यात ‘या’ २ महत्त्वाच्या स्पर्धा