येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्याची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशातच या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघातील फलंदाज हेनरी निकोलस याने भारतीय संघातील गोलंदाजांबद्दल भाष्य केले आहे.
हा सामना साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना भरपूर मदत मिळते. भारतीय कसोटी संघातील रवींद्र जडेजा आणि आर अश्विनची जोडी अंतिम सामन्यात मोलाची भूमिका बजावू शकते. तसेच मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा हे तिनही गोलंदाज जगातील कुठल्याही खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत.
अशातच न्यूझीलंड संघाचा फलंदाज हेनरी निकोलस याने भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना म्हटले की, “भारतीय संघात उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे अश्विन आणि जडेजासारखे अनुभवी गोलंदाज देखील आहेत. त्यांनी जगभरात क्रिकेट खेळले आहे. त्यांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मासह मोहम्मद शमीने देखील गेल्या काही वर्षात आपली छाप सोडली आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “अशातच तुम्ही जर अशा प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करत असाल, तर हे एक आव्हान असणार आहे. एक संघ म्हणून आमच्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे. परंतु आम्ही या आव्हानाचा स्विकार करण्यास तयार आहोत.”
निकोलसने आतापर्यंत न्यूझीलंड संघाकडून एकूण ३७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४३ च्या सरासरीने २१५२ धावा केल्या आहेत. यात त्याने १० अर्धशतक आणि ७ शतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी-पंतमुळे साहाच्या कारकिर्दीला सुरूंग; म्हणाला, ‘मग अर्धशतक करा वा शतक, सर्वकाही व्यर्थ’
आळशीपणाचा कळस! क्रिकेटविश्वातील सर्वात आळशी खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, रोहित ‘या’ भूमिकेत






