येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा रोमांचक सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिले आहे. या सामन्यात भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणून दिसून येत आहे.
ही स्पर्धा दोन्ही संघासाठी तितकीच महत्वाची आहे. परंतु या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली आयपीएल संघात खेळलेला एक खेळाडू भारतीय संघाला अडचणीत आणू शकतो.
आयपीएल २०२१ स्पर्धेत विराट कोहलीचा नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ चांगल्याच फॉर्ममध्ये होता. या संघातील फलंदाज आणि गोलंदाज चमकदार कामगिरी करत होते. तसेच आपला पाहिलेच हंगाम खेळत असलेल्या काइल जेमिसनने भारताच्या फिरकीस पोषख खेळपट्टीवर वेगवान बाऊन्सर चेंडू टाकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे काइल जेमिसन हा या मोठ्या सामन्यात चिंतेच कारण बनू शकतो. कारण इंग्लंडचे वातावरण वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असते.
आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १५ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. त्याने या हंगामात एकूण ७ सामने खेळले. यात त्याला ९ गडी बाद करण्यात यश आले. यासोबतच त्याने फलंदाजी करताना ५९ धावांचे योगदान दिले.
त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत अवघे ६ सामने खेळले आहेत. यात त्याने १३.३ च्या सरासरीने ३६ गडी बाद केले आहेत. अशीच कामगिरी त्याने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केली; तर नक्कीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजाने कमिन्ससह ४ ऑसी गोलंदाजांना ओढले बॉल टेम्परिंग प्रकरणात; म्हणाला, “त्यांच्या साथीदाराने…”
ट्वेंटी ट्वेंटीत एकही शतक न झळकावता ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, धोनीचाही समावेश