जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये साउथम्पटनच्या द रोज बाउलमध्ये खेळवला गेला. परंतु या सामन्याच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका राखीव दिवसाची तरतूद केली होती. त्यामुळे हा सामना राखीव दिवस म्हणजे सहाव्या दिवशी पण खेळवण्यात आला. सहाव्या दिवशी भारतीय संघ 2 बाद 64 धावा असतांना मैदानात उतरला होता. विराट कोहलीच्या संघाने सकाळचे सत्र सावधपणे खेळत न्यूझीलंड संघावर दबावात टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फरसा यशस्वी ठरला नाही.
काइल जेमिसन आणि टिम साउदी या जोडीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय संघाचा 170 धावांवर गुंडाळला. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा या उत्कृष्ट आणि फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय फलंदाजांचा न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंसमोर टिकाव लागला नाही.
या डावात वरच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर युवा रिषभ पंतवर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. मात्र तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. याच संदर्भात आता भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या मतानुसार, खेळाडूंची भागीदारी कमी पडल्याने भारतीय संघाला हार पत्करावी लागली.
सचिन तेंडुलकर यांनी यूट्यूब चैनलवर बोलताना म्हणाले की, “मी सांगितले होते की शेवटच्या दिवशीचे पहिले 10 षटक महत्वपूर्ण होते. जर ड्रिंक ब्रेकपर्यंत कोहली आणि पुजारा टिकून राहिले असते तर पुढे वेगाने खेळणारे खेळाडू होते. पंत आला आणि काही शॉट खेळून गेला. पण ज्यावेळी त्याच्या लक्षात आले की सामना सुरक्षित आहे, न्यूझीलंड आपण दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करू शकणार नाही. तेव्हा त्याने बचाव करायला हवा होता. हा मानसिकतेत करायचा बदल आहे.”
ते पुढे म्हणाले, “पहिल्या 10-12 षटकांत एकही विकेट न गमावणे फार महत्वाचे होते, परंतु त्याचवेळी न्यूझीलंड संघ कोहली व पुजाराला बाद करण्यात यशस्वी झाला. दोघेही लवकर बाहेर पडले आणि नंतर रहाणेही बाद झाला. ज्यामुळे भारतावर दबाव आला. सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले की, “पंतने शॉट खेळण्याचा आणि वेग बदलण्याचा प्रयत्न केला जेणेकरून काही धावा करता येतील. आपण त्यांना फलंदाजीची संधी देऊ शकलो असतो, आणि गोलंदाजांनी आणखी काही षटके खेळायला हव्या होती. पण भारताने विकेट गमावल्या आणि पहिल्या 10-15 षटकांत खेळाचा निर्णय झाला. जर आपण येथे भागीदारी केली असती तर न्यूझीलंड संघावर दबाव टाकू शकतो असतो.”
या पराभवानंतर भारतीय संघ कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी आयसीसीची स्पर्धा हरला आहे. त्यामुळे भारताचा आयसीसी करंडकाचा दुष्काळ कायम आहे. विराट कोहली आणि भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहेत. जिथे त्यांना ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघाबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! भारतीय महिला क्रिकेटपटू आढळली उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
कसोटी क्रिकेटमध्ये विराट ऐवजी हा खेळाडू आहे सरस कर्णधार, बदलू शकतो भारतीय संघाचे नशीब
ठरलं एकदाचे, टी २० विश्वचषक युएईत होणार! बीसीसीआय अध्यक्षांनी दिला दुजोरा