न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाने भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचे भारतीय संघाचे स्वप्नही भंगू शकते. भारतीय संघासाठी अंतिम सामन्यात पोहोचण्याची समीकरणे तशी सोपी आहेत. पण भारतीय संघासाठी हा मार्ग खडतर असेल.
भारतीय संघ अव्वल स्थानावर होता
न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतरही भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. मात्र, मालिका गमावण्यासोबतच भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 पॉइंट्स टेबलमध्येही मागे पडला आहे. टीम इंडिया आता दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.
भारतीय संघ आतापर्यंत 14 सामने खेळला आहे
भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 सायकलमध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 8 सामने जिंकले आहेत तर 5 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवाय 1 सामना अनिर्णित राहिला आहे. भारतीय संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याशिवाय श्रीलंका तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाला 4 सामने जिंकावे लागतील
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना टॉप-2 संघांमध्ये खेळला जातो. अशा परिस्थितीत अव्वल स्थानावर राहण्यासाठी भारतीय संघाला उर्वरित 5 पैकी 4 सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाला उर्वरित सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी हा विजय सोपा असणार नाही.
जर भारतीय संघ 4 सामने जिंकला आणि 1 सामना अनिर्णित राहिला तर भारताचे गुण 65.79% होतील. जर न्यूझीलंड संघाने घरच्या मैदानावर इंग्लंडला 3-0 ने पराभूत केले तर ही विजयी सरासरी न्यूझीलंडच्या कमाल (64.29%) पेक्षा किंचित जास्त असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“…तर बास्केटबॉल-फुटबॉल खेळा”, पीटरसनचा अप्रत्यक्षपणे रोहित आणि विराटवर निशाणा!
मोठी अपडेट! मोहम्मद शमी रणजी ट्राॅफी स्पर्धेतून बाहेर! बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीचे दरवाजे बंद
IND vs SA; टी20 मालिकेचं पूर्ण वेळापत्रक! कधी आणि कुठे पाहायचे सामने, जाणून घ्या सर्वकाही