जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ यांची गणना होते. चाहते तर सोडाच आजी-माजी दिग्गजही या दोघांची तुलना करताना सर्वोत्तम कोण याचा निर्णय घेताना गोंधळून जातात. दोघांचेही आकडे जबरदस्त आहेत. विशेष म्हणजे, दोघेही ‘फॅब फोर’ यादीत सामील आहेत. हे दोघेही सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहेत. अशातच आयसीसीने माजी दिग्गज खेळाडूंना विराट आणि स्मिथ यांच्यापैकी सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास सांगितले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पाकिस्तानचे माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram), न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor) आणि इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल (Ian Bell) यांना विराट-स्मिथविषयी प्रश्न विचारला. या तिघांनाही विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्यापैकी सर्वोत्तम खेळाडू सांगण्यास सांगितले.
हा प्रश्न ऐकल्यानंतर तिन्ही दिग्गज गोंधळात पडले. सुरुवातीला अक्रम यांनी प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, “आपल्या सर्वांना माहितीये की, विराट कोहली मागील दहा वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि त्यात त्याची सरासरी 50च्या वर राहिली आहे. तसेच, स्टीव्ह स्मिथ याचे नाव ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामील आहे. मात्र, माझ्या मते, विराटकडे खास प्रतिभा आहे.”
यानंतर इयान बेल म्हणाला की, “स्टीव्ह स्मिथ याचा फलंदाजी आणि धावा करण्याचा अंदाज वेगळा आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते आतापर्यंत त्याच्यात शानदार बदल झाला आहे आणि तो मैदानावर प्रत्येक शॉट सहजरीत्या खेळतो. दुसरीकडे, विराट कोहलीला फलंदाजी करताना मला खूप आवडते. त्याचा कव्हर ड्राईव्ह, पूल शॉट, कट शॉट पाहणे शानदार असते. माझ्या मते विराट सर्वोत्तम आहे.”
https://www.instagram.com/reel/CtLikfKseSG/?utm_source=ig_embed&ig_rid=66004026-be63-4ca4-8cd8-182c692e0147
तसेच, रॉस टेलर याने स्टीव्ह स्मिथ याला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हटले, तर विराट कोहली याला वनडे आणि टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडले.
भारताविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात खेळताना स्मिथने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 227 चेंडूंचा सामना करताना नाबाद 95 धावा केल्या. या धावा करताना त्याने 14 चौकारही मारले. स्मिथ आणि ट्रेविस हेड (नाबाद 146) याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 3 विकेट्स गमावत 327 धावा चोपल्या. (wtc final wasim akram ross taylor and ian bell picks best batter between virat kohli and steve smith know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलचा पहिला दिवस स्मिथ-हेडच्या नावे, ऑस्ट्रेलियाकडून 300 धावांचा टप्पा पार
ICC बादफेरीत चमकला स्मिथ, ‘या’ विक्रमात कॅलिस-संगकाराची बरोबरी, पण विराटचा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी