बांग्लादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवून इतिहास रचला आहे. रावळपिंडीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाला विजयासाठी 143 धावा करायच्या होत्या. बांग्लादेशने दुसरा सामना 6 गडी राखून जिंकला आणि क्रिकेटच्या इतिहासात बांग्लादेशने पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानचा पराभव आणि बांग्लादेशच्या विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतील समीकरणे बदलली आहेत.
बांग्लादेशने पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून मोठ्या पराभवाची चव चाखली होती. आता दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवल्याने डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत त्याचा फायदा झाला आहे. गुणांच्या टक्केवारीनुसार यादी तयार केल्यामुळे बांग्लादेश आता 45.83 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. या यादीत बांग्लादेश आता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांच्या पुढे गेला आहे.
नझमुल शांतोच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मात्र डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीचा मार्ग त्याच्यासाठी सोपा नाही. बांग्लादेश संघ काही आठवड्यात भारतासोबत 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. बांग्लादेशला विजेतेपदाचा मार्ग मोकळा करायचा असेल तर त्यांना पुढील दोन मालिका जिंकाव्या लागतील पण हे खूप अवघड काम असल्याचे दिसते.
पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सर्कलमध्ये पाकिस्तानने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान संघाची गुणांची टक्केवारी केवळ 19.05 आहे आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरले आहे. पाकिस्तानला अजूनही इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नंतर वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यात विजय मिळवूनही पाकिस्तान अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करू शकणार नाही.
सध्या भारताच्या गुणांची टक्केवारी 68.52 आहे. त्यामुळे टीम इंडिया सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने 60 टक्क्यांसह दुसरे स्थान पटकावले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला न्यूझीलंड (50 टक्के) खूप मागे आहे. त्यामुळे 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते असे दिसते.
हेही वाचा-
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ गोलंदाजाने एकाच षटकात दिल्या सर्वाधिक धावा
घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी
दुर्दैवच..! पॅरालिम्पिकमधील भारताच्या सुवर्णपदकाची चर्चा का होत नाही?