India vs South Africa 1st Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सेंच्युरियन कसोटी सामना खेळला गेला. पहिल्याच कसोटीत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी दारुण पराभव झाला. यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-24 स्पर्धेच्या गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. एका पराभवाने भारतीय संघाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावरून खाली कोसळला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या स्वप्नावरही पाणी फेरले गेले. विशेष म्हणजे, भारत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये, आता पुन्हा एकदा हा विक्रम कायम राहिला आहे.
डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर भारत डब्ल्यूटीसी पॉईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table) पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाला एका पराभवाने मोठा धक्का दिला आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान होता. मात्र, आता भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला याचा मोठा फायदा झाला आहे. संघ एका विजयासह थेट गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे. अशात भारतीय संघासाठी समस्या निर्माण झाली आहे. भारतीय संघ जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पुढील सामना पराभूत झाला, तर पुनरागमन करणे खूपच कठीण होईल.
India slips down to 5th position in WTC points table …#INDvSApic.twitter.com/oWyOiZfVyd
— Haroon Mustafa (@Haroon_HMM) December 28, 2023
रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
एका पराभवामुळे भारतीय संघावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रोहित शर्माचे प्रदर्शन दोन्ही डावात निराशाजनक राहिले. रोहितने पहिल्या डावात 5 धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावांवर तंबू गाठला. अशात रोहितच्या नेतृत्वासह फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रोहितला यजमान संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने दोन्ही डावात तंबूचा रस्ता दाखवला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसरा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान खेळला जाईल. या कसोटीत रोहितची सेना विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (wtc points table change after india vs south africa 1st test match)
हेही वाचा-
Team India Penalised: भारताला धक्क्यावर धक्के! ICCची मोठी कारवाई, आख्ख्या संघाला ठोठावला दंड
INDW vs AUSW: कर्णधार हरमनला खटकली टीम इंडियाची ‘ही’ गोष्ट, पराभवानंतर वाचून दाखवला चुकांचा पाढा