Keshav Maharaj Captain South Africa: 2025चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून म्हणजेच 28 जूनपासून सुरू होत आहे. पहिला सामना बुलावायो येथील क्वीन स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी टेम्बा बावुमाला संघातून वगळण्यात आले आहे. बावुमाच्याच नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 2025 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. मात्र, आता त्याच्या जागी भारतीय वंशाचा केशव महाराजला कर्णधार बनवण्यात आले आहे. (Keshav Maharaj Captain)
बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला होता. याचदरम्यान बावुमाला दुखापत झाली होती. बावुमाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आला होता. याच कारणामुळे बावुमा झिम्बाब्वेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (SA vs ZIM series)
बावुमाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद भारतीय वंशाच्या केशव महाराजला मिळाले आहे. केशवचे पूर्वज भारतातले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केशवचे पूर्वज उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी होते. ते 1874 मध्ये दक्षिण आफ्रिकेला स्थलांतरित झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये जन्म होऊनही, केशव आपल्या देशाच्या मुळांशी जोडलेला आहे. तो भगवान हनुमानाचा भक्त आहे. केशव प्रत्येक भारतीयाप्रमाणे भारतातील सर्व सण साजरे करतो. (Indian origin cricketer)
बावुमा व्यतिरिक्त, एडन मार्करम, रायन रिकल्टन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी यांसारखे वरिष्ठ खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत. या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, ज्यात डेवाल्ड ब्रेव्हिस, लुआन डी प्रिटोरियस आणि क्वेन मफाका यांचा समावेश आहे. (South Africa Cricket Team)
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग-11- टोनी डी जॉर्ज, मॅथ्यू ब्रीत्जके, वियान मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम, लुआन डी प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, काईल वेरेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज (कर्णधार), कोडी युसूफ, क्वेना मफाका (South Africa Playing 11)






