डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार ट्रिपल एच सध्या क्रिकेट वर्तुळातही चर्चेत आहे. काहीदिवसांपूर्वीच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे कौतुक केले होते. आता त्याने विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय संघाला एक आव्हान दिले आहे. सध्या भारतीय प्रेक्षांकांचा पाठिंबा पाहाता डब्ल्यूडब्ल्यूईने एक मोठा शो बनवला आहे. हा शो २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात १० भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई स्टार आणि काही डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार दिसणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर ट्रिपल एच सोनी स्पोर्ट्सच्या एक्स्ट्रा इनिंग या शोमध्ये चर्चा करत होता. यावेळी त्याने भारतीय क्रिकेट आणि संस्कृतीचे कौतुक केले. यावेळी जेव्हा त्याला विचारले की भारतीय क्रिकेटपटू आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्स यांच्यातील टक्कर कशा प्रकारे असेल. तो म्हणाला, आमच्याकडे आमचा क्रिकेट संघ बनवण्यासाठी भरपूर भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार आहेत. एक संधी दिली तर मी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध भारतीय डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार यांच्यातील सामन्याचे स्वागत करेल.
तसेच तो पुुढे म्हणाला, मला सामन्यासाठी वेळेची आणि जागेची गरज आहे. मग आम्ही पाहू हे कसे पूर्ण करायचे. याबरोबरच तो म्हणाला, तो चांगली फलंदाजी करु शकतो.
याआधी ट्रिपल एचने सांगितले होते की तो कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतो. जर त्यानं क्रिकेटमध्ये करिअर निवडलं तर तो क्रिकेटमध्ये देखील सर्वोत्तम असता. तो सचिनसारखा नाही पण त्याने सचिन प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला असता. कदाचित तो पुढचा सचिनही झाला असता.
ट्रिपल एच क्रिकेटचाही चाहता, विश्वविजेत्या इंग्लंडला दिली होती भेट
ट्रिपल एचने याआधीही अनेकदा क्रिकेटबद्दल भाष्य केले आहे. त्याने २०१९ च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाला कस्टम चॅम्पियनशिप बेल्ट भेट दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची
अविश्वसनीय! मार्टिन गप्टिलने घेतलेला हा भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ
कोहली का रहाणे, कोण आहे टीम इंडियाचा उत्कृष्ट कर्णधार?, टी नटराजनने सांगितलं नाव






