दुबई | आज आयसीसीने टी२० क्रमावरी घोषीत केली. भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया टी२० मालिकेनंतर ही क्रमवारी घोषीत करण्यात आली आहे.
बाबर आझमने फलंदाजीत, राशिद खानने गोलंदाजीत तर ग्लेन मॅक्सवेलने अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.
कुलदीप यादव आणि अॅडम झंपाने मोठी झेप घेत पहिल्या ५ गोलंदाजांत स्थान पटकावले आहे. त्यांनी पहिल्यांदाच कारकिर्दीत पहिल्या ५ गोलंदाजांत स्थान मिळवले आहे.
सोमवारी घोषीत झालेल्या क्रमवारीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील एक टी२० सामना तसेच भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया टी२० मालिका विचारात घेण्यात आली आहे.
कुलदीप यादवला २० स्थानांचा फायदा होऊन नविन क्रमवारीत तो तिसरा तर अॅडम झंपाला १७ स्थानांचा फायदा होऊन तो ५व्या स्थानी आला आहे.
या दोन गोलंदाजांमुळे भारताचा जसप्रीत बुमराह आणि बांगलादेशचा मुस्तफिझूर रहेमानला पहिल्या २० गोलंदाजातून बाहेर जावे लागले आहे.
गोलंदाजीत युझवेंद्र चहल ७व्या तर भुवनेश्वर कुमार १९व्या स्थानी आहे.
रोहित शर्माला मोठा फटका-
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दोन स्थानांचा फटका बसला असून तो ९व्या स्थानी गेला आहे तर शिखर धवनला ५ स्थानांचा फायदा होऊन तो ११व्या स्थानी आला आहे.
केएल राहुलला देखील रोहित प्रमाणेच दोन स्थानांचा फटका बसून तो ६व्या स्थानी आला आहे. विराट कोहली मात्र १४व्या स्थानी कायम आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये पहिल्या पाचमध्ये भारताचा एकही खेळाडू नाही.
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा
–प्रो कबड्डीचा पोस्टर बाॅय राहुल चौधरीसाठी आजचा दिवस खास, सुवर्णक्षरांनी लिहीले जाणार नाव
–१८ वर्षीय नवीन कुमारचा प्रो कबड्डीत विक्रमांचा विक्रम
–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ