भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे होणार असून त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 16 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियात प्रथमच वेगवान गोलंदाज यश दयालला संधी मिळाली आहे. आयपीएल 2023 च्या एका षटकात सलग पाच षटकार मारण्यापासून ते टीम इंडियापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा यश दयालचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे.
उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा यश दयाल आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. आयपीएल 2023 मध्ये यश विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग 5 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. एका षटकात सलग पाच षटकार मारल्यानंतर यश दयालची अवस्था खूप वाईट झाली होती. तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याचे सुमारे 5-6 किलो वजन कमी झाले होते. एवढेच नाही तर 5 षटकार मारल्यानंतर यशचे करिअरही धोक्यात आले होते.
MAIDEN CALL FOR YASH DAYAL INTO INDIAN TEAM 🔥
– Yash has been included in the Indian squad for the first Test vs Bangladesh. pic.twitter.com/QX5joe8Tq3
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2024
पाच षटकार मारणाऱ्या यश दयालला आयपीएल 2024 पूर्वी गुजरातने सोडले होते. त्यानंतर 2024 च्या आयपीएलमध्ये यशला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटी रुपयांना विकत घेतले. यशने आरसीबीमध्ये येऊन शानदार पुनरागमन केले. यशने मोसमात 14 सामने खेळले आणि 15 विकेट घेतल्या. आरसीबीमधील चमकदार कामगिरीनंतर यशचे नाव टीम इंडियात सहभागी होण्यासाठी चर्चेत आले होते. यश सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या दरम्यान, त्याची टीम इंडियासाठी निवड झाली.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
हेही वाचा-
बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रुतुराजकडे पुन्हा दुर्लक्ष
ENG vs SL: जो रूट घालतोय धुमाकूळ, दिग्गजाला मागे टाकून केला नवा रेकाॅर्ड
‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरचे 3 महान रेकाॅर्ड कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे अशक्य