गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या जोरदार चर्चेत आला आहे. दयालने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात रिंकू सिंगने त्याला 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारल्यानंतर तो चर्चेत आला होता. अशात नुकतेच यशने सोशल मीडियावर एक व्यंगचित्र शेअर केले. ते व्यंगचित्र व्हायरल होत असून वादात सापडले आहे. यामुळे दयाल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. खरं तर, सोमवारी (दि. 05 जून) त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लव्ह जिहादवर एक व्यंगचित्र शेअर केले होते. मात्र, त्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या.
दयालने घटनेबद्दल मागितली माफी
दयालने त्याच्या अकाउंटवरून फोटो डिलीट करे पर्यंत अनेकांनी त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट घेतले. यानंतर यशने इन्स्टाग्राम स्टोरीवर माफीनामा लिहिला. त्यात त्याने लिहीले की “मित्रांनो, मी घडलेल्या घटनेबाबात माफी मागतो. हे चुकून पोस्ट केले गेले. कृपया याबाबत द्वेष पसरवू नका… मला प्रत्येक समाजाबद्दल आदर आहे.”
पहिले ट्विट झाले व्हायरल
यश दयालच्या पर्सनल अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला फोटो कमी वेळात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा फोटो तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एक मुस्लीम मुलगा हिंदु मुलीला प्रेमाचे बोल बोलत आहे. लक्ष देऊन पाहिल्यास समजेल की, फोटोमधील प्रत्येक कबरीवर हिंदु मुलीचे नाव आहे. या फोटोमुळे सध्या इंटरनेटवर वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘माझे अकाउंट झाले हॅक’
दयालच्या (Yash Dayal) एका ट्विटने संपुर्ण सोशल मीडिया हादरून टाकला. त्याने प्रतिक्रिया देत बाबत खुलासा केला. ट्विटमध्ये त्याने लिहीले की, “आज माझ्या इन्स्टा हँडलवर दोन फोटो पोस्ट केले गेले आहेत. त्या दोन्ही स्टोरी मी पोस्ट केलेल्या नाहीत. माझे खाते इतर कोणीतरी वापरत आहे आणि त्यावर वादाच्या गोष्टी पोस्ट करत आहे. मी या प्रकरणाची माहिती अधिकार्यांना देखील दिली आहे.”
क्रिकेटमधील दयालचे आगमन
दयालने उत्तर प्रदेशकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच, त्याने 2018 मध्ये गोव्याविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केली. तर त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट मध्ये पदार्पण फेब्रुवारी 2019 मध्ये महाराष्ट्राविरुद्ध झाले. यावर्षी 9 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) रिंकू सिंगने (Rinku Singh) सलग 5 षटकार ठोकल्यानंतर यश अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर तो टायटन्सकडून एका महिन्यापेक्षा जास्त काळ खेळताना दिसला नाही. पण नंतर त्याने आणखी दोन सामने खेळले. दयालने या हंगामामध्ये पाच सामन्यांत 11.78 च्या इकॉनॉमी रेटने दोन विकेट घेतल्या. इंडियन प्रीमिअर लीग 2022 (Indian Premier League 2023) च्या आधी टायटन्सने (Gujarat Titans) त्याला विकत घेतले. दयालने त्याच्या पदार्पणाच्या हंगामात संघासाठी 9 सामने खेळले आणि 11 बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?