---Advertisement---

शतकवीर यश धूलच्या खेळीवर वडिल म्हणाले, ‘कष्टाचं चीज होताना दिसतंय’; फायनलसाठी मोलाचा सल्लाही दिला

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 4:08 PM
Yash-Dhull
---Advertisement---

मंगळवारी (०२ फेब्रुवारी) अँटिग्वा येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषकाचा (U19 World Cup) उपांत्य सामना (Semi Final) झाला. भारतीय संघाने ९६ धावांनी दणदणीत विजय साजरा करत सलग चौथ्या वेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली. भारतीय संघाच्या विजयात कर्णधार यश धूल (Yash Dhull)याचा मोठा हात राहिला. त्याने शतकी खेळी (११० धावा) करत संघाला विजयाच्या जवळ नेले.

त्याच्या या खेळीवर आणि संघाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यावर यशचे वडील  (Yash Dhull’s Father) विजय सिंग (Vijay Singh) खूप आनंदी आहेत. त्यांनी यशच्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक (Father Reaction On Yash Dhull) केले आहे. याबरोबरच अंतिम सामन्यापूर्वी त्याला महत्त्वाचा सल्लाही (Father’s Advice To Yash Dhull) दिला आहे. 

दोन्ही संघ बरोबरीचे
यशचे वडिल अंतिम सामन्यासाठी त्याला सल्ला देताना टीव्ही ९ भारतवर्षला म्हणाले, सर्व मुले चांगली खेळत आहेत. आता तर दोन्ही संघ एकमेकांच्या बरोबरीचे आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात जो संघ चांगला खेळेले, तोच संघ जिंकेल. भारतीय असल्याच्या नाते मी अपेक्षा करतो की, आपणचा हा सामना जिंकू. परंतु दुसरा संघही तितक्याच मेहनतीनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच हे शिकवले जाते की, विरोधी संघाला सन्मान केला पाहिजे. जो संघ तुमच्या विरोधात आहे, त्यांनी बरोबरीचे समजले पाहिजे. भारताचा संघ ट्रॉफी जिंकूनच येईल, यात तिळमात्र शंका नाही. पण दुसऱ्या संघालाही कमजोर समजू नका, इतकंच. 

कष्टाचं चीज होताना दिसतंय
यशने १९ वर्षांखालील विश्वचषकातील पहिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळला होता. परंतु पुढे तो कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने त्याला पुढील दोन्ही साखळी फेरी सामन्यांना मुकावे लागले होते. उपांत्यपूर्व सामन्यातून त्याने संघात पुनरागमन केले होते. तर उपांत्य फेरी सामना हा त्याचा तिसराच सामना होता आणि याच सामन्यात त्याने यंदाच्या विश्वचषकातील आपले शतक केले.

या शतकी खेळीबद्दल बोलताना त्याचे वडिल म्हणाले की, त्यावेळी तर सगळेच आनंदी होते, सर्वांनाच चांगले वाटले होते. कारण या पातळीवर जाऊन अशा प्रकारचे प्रदर्शन केले, तर वाटते की, हो. त्याने यासाठी जी मेहनत घेतलीय, ती फळाला आली आहे. त्याची आईसुद्धा त्याच्या खेळीवर खुश होती. 

अंतिम सामन्याचा नाही घेणार दबाव
विश्वचषकाचा अंतिम सामना हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा सामना असतो. तरीही यश या सामन्याचा कसलाही दबाव घेणार नसल्याचे मत विजय सिंग यांचे आहे. ते म्हणाले की, तो कोणत्याही पातळीवर असला तरीही तो सामान्य स्थितीत खेळल्यासारखाच खेळतो. त्याच्यातील सर्वात चांगला गुण म्हणजे, तो मैदानावर चालू असलेल्या गोष्टींवरच लक्ष देतो. तो जास्त दबाव घेत नाही. तो बाहेरच्या गोष्टींचाही विचार करत नाही. तो मैदानावर संघाच्या गरजेनुसार निर्णय घेतो. त्याला दबाव घेण्याची सवय नाही. 

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय कसोटी संघातून रहाणे अन् पुजाराची होणार सुट्टी! बीसीसीआय अध्यक्षांच्या या वक्तव्याने दिले संकेत

“मला नाही वाटत वेंकटेश अय्यर अधिक यशस्वी होईल..” माजी भारतीय क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रीया

इंग्लंड क्रिकेटमध्ये वादळ! ऍशेस मालिकेतील पराभवानंतर ‘या’ सदस्याने दिला राजीनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---