सध्या सुरू असलेल्या एमर्जिंक आशिया चषक खेळला जात आहे. शुक्रवारी (15 जुलै) या स्पर्धेत भारत आणि यूएई संघ आमने सामने होते. यश धूल याच्या नेतृत्वातील भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. यशने या सामन्यात 84 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली आणि कर्णधारपदाची जबाबदारीही चोख पार पाडली. या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. सामना संपल्यानंतर यश माध्यमांशी बोलताना विराट कोहली याचे गोडवे गाताना दिसला.
माध्यमांसमोर यश धूल (Yash Dhull) म्हणाला, “मी विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून खूपकाही शिकलो आहे. खासकरून, विराटचा आक्रमक स्वभाव मिला खूप आवडतो. जेव्हा तो फलंदाजी करतो, तेव्हा त्याची जी मानसिकता असते, ती कौतुकास्पद आहे. विराटकडून खरोखर खूपकाही शिकण्यासारखं आहे.” सोशल मीडियावर यशचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. यशकडे भारतीय संघाचा भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. अशात विराटविषयी त्याच्या मनात असलेला आदर संघाच्या प्रदर्शनावर थेट प्रभाव टाकणारा ठरू शकतो, असे अनेकांना वाटते. (Men’s Emerging Asia Cup 2023)
यश धूलच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने भारतासाठी 19 वर्षांखाली विश्वचषक नॉर्थ झोन, रेस्ट ऑफ इंडिया आणि भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतो. पण त्याला आतापर्यंत केवळ चार आयपीएल सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. या चार सामन्यात त्याने 16 धावा केल्या आहेत. मागच्या वर्षी यशच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 19वर्षींखालील विश्वचषक देखील जिंकला होता. विश्वचषकानंतर यशसाठी लवकरच भारताच्या परिष्ठ संघाचे दरवाचे खले होतील, असे वाटत होते. मात्र, अद्याप यशसाटी संघात जागा तयार होताना दिसत नाहीये. पण येत्या काळात त्याने असेच चांगले प्रदर्शन सुरू ठेवले, तर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला त्याला संघात घेण्याविषयी विचार करावा लागेल. (Yash Dhull himself says that I have a good bonding with Virat Kohli)
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभागाला चॅम्पियन बनवल्यानंतर विहारी स्पष्टच बोलला, म्हणाला…
नुकत्याच निवडलेल्या युवा संघात निवडकर्त्यांनी 32 वर्षीय खेळाडूला दिली संधी, करिअर संपता संपता वाचलं!