---Advertisement---

नुकत्याच निवडलेल्या युवा संघात निवडकर्त्यांनी 32 वर्षीय खेळाडूला दिली संधी, करिअर संपता संपता वाचलं!

Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघऑ यावर्षी तीन मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाला आशिया चषक खेळायचा आहे. त्यानंतर भारतीय संघ 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा खेळणार आहे. तसेच, 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशात भारतीय निवडकर्त्यांनी आशियाई स्पर्धांसाठी एका युवा संघाची घोषणा केली आहे. मात्र, या संघात एक 32 वर्षीय खेळाडूही आहे. या खेळाडूला आतापर्यंत भारतीय संघाकडून खेळण्याची कमी संधी मिळाली आहे.

थोडक्यात वाचली कारकीर्द?
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023)मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) करणार आहे. तसेच, या संघात 32 वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याला संधी देण्यात आली आहे. त्रिपाठी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात आपले स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. अशात त्याची कारकीर्द संकटात असल्याचे बोलले जात होते. मात्र, निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्याला मोठी संधी दिली आहे.

भारतीय संघाकडून खेळले 5 सामने
राहुल त्रिपाठी याने भारतीय संघाकडून आतापर्यंत फक्त 5 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 19.4च्या सरासरीने 97 धावा केल्या आहेत. महाराष्ट्र संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा त्रिपाठी यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेचा भाग होता. त्याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी तिसऱ्या टी20 सामन्यात शानदार खेळी साकारली होती. त्या सामन्यात त्रिपाठीने 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. त्रिपाठी 22 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार मारत 44 धावांवर तंबूत परतला होता.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार आकडेवारी
त्रिपाठीने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये प्रत्येकी 53 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 7 शतकांसह 2796 धावा केल्या आहेत. तसेच, 13 विकेट्सही नावावर केल्या आहेत. याव्यतिरिक्त अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 4 शतकांसह 1782 धावा करत 6 विकेट्स घेतल्या आहेत. अशात त्रिपाठीला आशियाई स्पर्धांमध्ये संधी मिळाली, तर तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल. (cricketer ruturaj gaikwad part of team india squad for asian games 2023 know here)

महत्वाच्या बातम्या-
‘अनारकली’चा उल्लेख करून रोहितने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, पत्नी रितिकाने खोलली पोल; कमेंट व्हायरल
खूपच कमी वयात आफ्रिदीची कसोटीत मोठी कामगिरी, श्रीलंकेच्या सलामीवीराची विकेट घेताच रचला विक्रम; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---