आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup) स्पर्धेत बुधवारी (२ फेब्रुवारी) उपांत्य फेरीतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना भारतीय संघाने ९६ धावांनी आपल्या नावावर केला. यासह स्पर्धेच्या अंतिम फेरीत देखील प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर कर्णधार यश धूलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ९६ धावांनी विजय मिळवला. यासह सलग चौथ्यांदा आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१६,२०१८, २०२० आणि आता २०२२ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली विजेतेपद देखील मिळवले होते.
सामना झाल्यानंतर कर्णधार यश धूल म्हणाला की, “माझी आणि राशिदची शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची रणनिती होती. ही रणनिती आमच्यासाठी फायदेशीर ठरली. विराट कोहली आणि उन्मुक्त चंदनंतर आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत शतक पूर्ण करणारा मी तिसरा भारतीय कर्णधार आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही ४० व्या षटकपर्यंत संथ गतीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राशिद आणि माझ्यात चांगली भागीदारी झाली. खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील महत्वपूर्ण योगदान दिले. राशिद मानसिकरित्या खूप मजबूत आहे.”
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून कर्णधार यश धूलने सर्वाधिक ११० धावांची खेळी केली. तर शेख राशिदने ९४ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ५ बाद २९० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून लचलान शॉने ५१ धावांची खेळी केली. तर कोरी मिलरने उपयुक्त धावांचे योगदान दिले होते. हा सामना भारतीय संघाने ९६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
लाजवाब शतकासह यश धूल बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा कर्णधार; मिळाले विश्वविजयाचे शुभसंकेत
मेगा ऑक्शनपूर्वी उघड झाली केकेआरची रणनिती! प्रशिक्षक म्हणतायेत,”कोरोनानंतर…”
श्रेयसने इंस्टाग्रामवर शेअर केला लहानपणीचा फोटो; कॅप्शन ठरले लक्षवेधक