भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर (shreyas iyer) याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत श्रेयसने स्वतःचा लहानपणीचा आणि सध्याचा भारतीय संघाच्या जर्सीतील फोटो शेअर केला आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.
https://www.instagram.com/reel/CZeOe8yhtZU/?utm_medium=copy_link
श्रेयस अय्यरने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अय्यर भारताच्या निळ्या जर्सीत कवर ड्राइव्ह खेळत आहे, तर लहानपणीच्या एका फोटोतही तो निळ्या विजारीत कवर ड्राइव्ह खेळताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “स्टिल ईन ब्लू ऍन्ड स्टिल इन कवर ड्राइव.” या कॅप्शनमधून अय्यरने लहानपणीच्या आणि आताच्या फोटोतील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात ६ फेब्रुवारीपासून मायदेशात मालिका खेळली जाणार आहे. उभय संघात सुरुवातीला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल, तर त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. श्रेयस अय्यरला एकदिवसीय आणि टी२० या दोन्ही संघात निवडले गेले आहे. परंतु प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा अद्याप निश्चित दिसत नाही.






