पोचेफस्टरूम| आज(9 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील विश्वचषकात 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 47.2 षटकात सर्वबाद 177 धावा करत बांगलादेशला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे.
भारताकडून सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने अर्धशतकी खेळी करत एकाकी झूंज दिली. याबरोबच त्याने एक खास विक्रम केला आहे. त्याने 121 चेंडूत 88 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.
त्यामुळे तो 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा 5 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
याआधी 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उन्मुक्त चंंद, समित पटेल, सर्फराज खान आणि मनज्योत कारला या भारतीय क्रिकेटपटूंनी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यातील उन्मुक्त आणि मनज्योत यांनी शतकी खेळी केली आहे. तर समित आणि सर्फराजने अर्धशतकी खेळी केली आहे.
आज सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2020 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाकडून यशस्वी व्यतिरिक्त केवळ तिळक वर्मा(38) आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव चंद जुरेल(22) यांंनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली आहे. अन्य भारतीय फलंदाज एक आकडी धावसंख्येवरच बाद झाले.
बांगलादेशकडून अविषेक दासने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शोरीफुल इस्लाम आणि तान्झिम हसन साकिब यांनी प्रत्येकी 2 विकेट्स तर राकिबुल हसनने 1 विकेट घेतली.
19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 50+ धावांची खेळी करणारे भारतीय क्रिकेटपटू –
उन्मुक्त चंद – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2012 (111*धावा)
समित पटेल – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2012 (62*धावा)
सर्फराज खान – विरुद्ध वेस्ट इंडिज, 2016 (51 धावा)
मनज्योत कारला – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018 (101* धावा)
यशस्वी जयस्वाल – विरुद्ध बांगलादेश, 2020 (88 धावा)
दुसऱ्या वनडेत पराभव झाल्यानंतरही या गोष्टीसाठी कर्णधार कोहली आहे खुश https://t.co/Lm580QQlwQ#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND
— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
भारताविरुद्ध सामना जिंकल्यानंतरही न्यूझीलंडला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा https://t.co/Iz8cgxYVTD#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND
— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020