तमाम क्रिकेटप्रेमींच्या प्रतिक्षेचा क्षण संपणार आहे. कारण श्रीलंका दाैऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची टी20 मालिकेतील पहिला सामना आज (27 जुलै) रोजी होणार आहे. या दोऱ्यावर भारतीय संघाला 3 टी20 आणि तेवढ्याच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. खरं तर, आजच्या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालवर असतील. आजच्या सामन्यात 22 वर्षीय फलंदाजाने 47 धावा केल्या तर 2024 साली 1000 धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरेल.
Yashasvi Jaiswal needs 47 runs to become the 1st batter to complete 1,000 international runs in 2024.
– The rise of Jaiswal! ⭐ pic.twitter.com/OnFEb3aulo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 27, 2024
यशस्वी जयस्वालने 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 11 सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 16 डावात 68.07 च्या सरासरीने 953 धावा झाल्या आहेत. चालू वर्षात त्याने 2 शतके आणि 5 अर्धशतकेही केली आहेत. सध्या तो 91.10 च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे. 2024 मध्ये जयस्वालने आतापर्यंत 96 चौकार आणि 38 षटकार मारले आहेत.
तर दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा इब्राहिम झाद्रानचे नाव येते. इब्राहिमने चालू वर्षात आपल्या संघासाठी 25 सामने खेळताना 27 डावांमध्ये 33.76 च्या सरासरीने 844 धावा केला आहे. ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 8 अर्धशतक ठोकल्या आहेत.
2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे जगातील टाॅप- 5 फलंदाज
953- यशस्वी जयस्वाल – भारत
844 – इब्राहिम झद्रान – अफगाणिस्तान
833- रोहित शर्मा – भारत
833 – कुसल मेंडिस – श्रीलंका
773 – रहमानउल्ला गुरबाज – अफगाणिस्तान
श्रीलंकामालिकेबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघ आपल्या नव्या टी20 कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे गाैतम गंभीरची पण ही मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका आहे. तर दुसरीकडे एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच कर्णधार असेल. या व्यतिरिक्त शुबमन गिलसाठी देखील ही मालिका खास असणार आहे. कारण गिलला या मालिकेमध्ये म्हत्त्वाची उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आले आहे.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना जेवण मिळालं नाही, प्रवास करतानाही अडचणी
केएल राहुलचा राऊडी अंदाज! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी उडवलं ‘फायटर प्लेन’; VIDEO व्हायरल
‘कोच नाही…’, गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनल्याने माजी दिग्गज खेळाडू नाराज?