टी20 विश्वचषक 2024 दरम्यान भारतीय संघाचा युवा प्रतिभवान खेळाडूयशस्वी जयस्वालच मोठं नूकसान झालं आहे. वास्तविक, आयसीसी टी20 क्रमवारीत यशस्वीची घसरण झाली आहे. यशस्वी जयस्वाल आयसीसी टी20 क्रमवारीत सातव्या स्थानी घसरला आहे. याअधी तो साहव्या स्थानी होता. सध्या यशस्वीकडे 693 रेटिंग गुण आहेत.
आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनूसार ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला मोठा फायदा झाला आहे. त्याने 5 स्थानांची मोठी झेप घेत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या त्याचे 742 रेटिंग गुण आहेत. तर टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सुर्यकुमार यादव 837 रेंटिगसह पहिल्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज फिलिप साल्टसह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि त्याचा साथीदार मोहम्मद रिझवान आपापल्या स्थानावर कायम आहेत. 771 रेटिंग गुणांसह साल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. तर बाबर आझमच्या नावावर 755 रेटिंग गुण आहेत आणि तो तिसऱ्या स्थानावर कायम आहे. रिझवान चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 746 रेटिंग गुण आहेत.
यशस्वी जयस्वालने भारतीय संघासाठी टी20 मध्ये 8 ऑगस्ट 2023 मध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने आपल्या टी20 करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्याने 17 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 502 धावा केल्या आहेत. यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाच्या टीम कम्बिनेशन मुळे यशस्वीला आणखी पलेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळाले नाही.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. साखळी सामन्यात संघात भारताने 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सुपर-8 मध्ये दोखील भारताने अफगाणिस्तानला 47 धावांनी धूळ चारली आहे. आता 22 जून रोजी सुपर-8 चा दुसरा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
अपसेट करण्यात माहीर आहे बांग्लादेशचा संघ! विजयासाठी टीम इंडियाला संघात करावे लागतील हे बदल
सुपर 8 सामन्यात बांग्लादेशचे हे 3 खेळाडू ठरू शकतात डोकेदुखी, टीम इंडियाला राहावं लागेल सावध
बांग्लादेशनं भारताला डिवचलं; सुपर-8 सामन्यापूर्वी शेअर केला 20 वर्षापूर्वीचा व्हिडिओ