भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात शनिवारी (13 ऑगस्ट) ला चौथा टी20 सामना खेळला गेला. सामन्यात भारतीय संघाने विजय प्राप्त करुन पाच टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बराबरी केली आहे. सामन्यात भारतीय संघाच्या सलामविरांनी तुफान खेळी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम काढला. शुभमन गिल 47 चेंडूत 77 धावा करुन बाद झाला. तर, 51 चेंडूत 84 धावा करुन यशस्वी जयस्वाल नाबाद राहीला. या खेळाच्या जोरावर यशस्वीने विशेष कामगीरी केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऋषभ पंत यांच्याशी संबंधित विशेष यादीत यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) ने स्थान मिळवले आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा यशस्वी भारताचा चौथा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने वयाच्या 21 वर्षे 227 दिवसांत अर्धशतक झळकावले आहे. तर यादित रोहित अव्वल स्थानी आहे.
कर्णधार रोहित हा भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. वयाच्या 20 वर्षे 143 दिवसात त्याने हा विक्रम केला. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये नाबाद 50 धावा केल्या होत्या. यात तिलक वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सध्याच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने 51 धावा केल्या होत्या. वयाच्या 20 वर्षे 271 दिवसात त्याने ही कामगिरी केली. या बाबतीत ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यशस्वीसोबत शुभमननेही चौथ्या टी20 मध्ये चमकदार कामगिरी केली. या दोघांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली. गिलने 47 चेंडूंचा सामना करत 77 धावा केल्या. त्याने 5 षटकार आणि 3 चौकार मारले. तिलक वर्मा 7 धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडिजने दिलेले लक्ष्य भारताने 17 षटकांतच पूर्ण केले. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने 61 धावा केल्या. त्याने 39 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले. (yashasvi jaiswal score a half century in t20i for india he is 3rd youngest player)
महत्वाच्या बातम्या-
सामनावीर ठरल्यानंतर सीनियर खेळाडूंबद्दल हे काय बोलला यशस्वी? म्हणाला…
फ्लोरिडातही टीम इंडिया ‘यशस्वी’! सलामीवीरांच्या तडाख्याने हार्दिक सेनेची मालिकेत बरोबरी