येत्या २० फेब्रुवारीपासून विजय हजारे ट्रॉफी सुरू होणार आहे. याच स्पर्धेसाठी मुंबई संघ कसून सराव करत आहे. अशातच युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल हा फॉर्ममध्ये येताना दिसत आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई संघाचे सराव सामने सुरू आहे. सराव सामन्यामध्ये मुंबई सी संघाकडून खेळताना मुंबई ए संघाविरुद्ध यशस्वी याने ९७ चेंडूंमध्ये १४२ धावा कुटल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
मुंबई सी संघाने जिंकला सामना
विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या सराव सामन्यामध्ये मुंबई सी संघाने मुंबई ए संघाला पराभूत केले आहे. या सामन्यात मुंबई ए संघाने प्रथम फलंदाजी करतांना ४८ षटकात ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबई सी संघाकडून यशस्वी आणि पृथ्वी शॉ हे दोघे फलंदाज सलामीसाठी आले होते. या दोघांच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पृथ्वी शॉ याने ३५ धावा केल्या तर जयस्वाल याने शतकीय खेळी करत अवघ्या ३६ षटकात सामना मुंबई सी संघाला जिंकून दिला.
अर्जुन तेंडुलकर याच्या गोलंदाजीवर कूटल्या भरपूर धावा
मुंबई सी कडून हार्दिक तैमोर याने यशस्वी जयस्वाल याला चांगली साथ दिली. त्याने ७४ चेंडूवर ६९ धावा केल्या. तसेच सरफराज खान याने १३ चेंडुंमध्ये धुवाधार ४९ धावांची खेळी केली. मात्र, आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या निलामीसाठी नोंदणी करणाऱ्या अर्जुन तेंडुलकर याला ४.१ षटकात ५३ धावा देऊन एकही विकेट मिळाला नाही.
मुंबई ए संघाने केले होते ३११ धावा
मुंबई ए संघाकडून सुजित नायक, तनुष कोटलान आणि आदित्य तारे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला ८ बाद ३११ धावांपर्यंत नेले. यात नायक याने सर्वाधिक ९० धावा केल्या. तर कोटलान याने ८२. मुंबई सी तर्फे गोलंदाजी करत असताना प्रथमेश डेक याने १० षटकात ८६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
एक असा दर्शक, जो कसोटीतील दोन्ही १० विकेट हॉलचा साक्षीदार ठरला
अबब! फक्त ३ विकेट्स घेण्यासाठी अश्विनने टाकले ३०० हून जास्त चेंडू