---Advertisement---

साल १९८३ च्या टीम इंडियाच्या शिलेदारांचा पगार होता न सांगण्यासारखाच, पहा किती रुपये मिळायचे कपिलच्या संघाला

On: रविवार, फेब्रुवारी 7, 2021 2:05 PM
---Advertisement---

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. क्रिकेटपटूंना बीसीसीआय करोडो-लाखो रुपये पगार देते. पण 1983 साली परिस्थिती पूर्ण वेगळी होती. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने मजबूत वेस्ट इंडिजच्या संघाला नेस्तनाबूत करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंना मॅच फीस म्हणून 1500 हजार रुपये आणि 200 रुपये दैनिक भत्ता दिला गेला. 

त्याच वर्षी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्ध एक डे नाईट प्रदर्शनी वनडे सामना खेळविण्यात आला. हा सामना पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय एकादश संघाने एक गडी राखून विजय मिळवला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 197 धावा केल्या होत्या.

सलामीचा फलंदाज मोहसिन खान 50 आणि मुदस्सर नजर यांनी 65 धावांची खेळी साकारली. त्यावेळी एकदिवसीय सामने 60 षटकांचे खेळविले जायचे. ‘बॅडलाइट’ मुळे हा सामना 50 षटकांचा खेळवण्यात आला होता.

धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 101 धावांवर सात गडी बाद झाले होते. पण किर्ती आझाद यांनी नाबाद 71 आणि मदनलाल यांच्या 35 धावांच्या जोरावर भारताने हा सामना 1 गडी राखून जिंकला. या सामन्यासाठी देखील भारतीय खेळाडूंना 1500 रुपये मॅच फी आणि 200 रुपये दैनिक भत्ता देण्यात आला होता.

प्रदर्शनीय सामन्यासाठी मिळाले होते 2100 रुपये

भारतीय संघात त्यावेळी कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ (उपकर्णधार), सुनील गावस्कर, कृष्णामाचारी श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटिल, कीर्ति आजाद, रॉजर बिन्नी, मदनलाल, सैय्यद किरमानी, बलविंदर सिंह संधू, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री हे खेळाडू होते तर बिशनसिंग बेदी हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापकाला तीन दिवसांचा एकूण भत्ता 600 रुपये आणि मॅच फीसह 150 असे एकूण 2100 रुपये देण्यात आले.

सध्या खेळत असलेल्या पुरुष क्रिकेटपटूंचा वार्षिक मानधन करार-

अ+ श्रेणी (7 कोटी) – विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा

अ श्रेणी(5 कोटी) – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत, केएल राहुल.

ब श्रेणी (3 कोटी) – वृद्धिमान सहा, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयंक अगरवाल

क श्रेणी(1 कोटी) – केदार जाधव, मनीष पांडे, हनुमा ​​विहारी, नवदीप सैनी, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---