कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असाही होता, जेव्हा गोलंदाजांची दहशत वेगळीच होती. सुरुवातीचे कसोटी क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांसाठी ओळखले जात होते. वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज तर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या चेंडूंच्या तालावर थिरकवत होते. अनेक फिरकीपटूंनीही आपली जादुई गोलंदाजी दाखवत कसोटी सामने जिंकून दिले.
तसं तर, कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला एका डावात ५ पेक्षा विकेट्स घेताना पाहणे साधारण गोष्ट आहे. मात्र, जर गोलंदाजाने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या, असं सांगितलं तर ही सरळ सरळ अशक्य गोष्ट वाटते. पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे असाधारण काम तीन गोलंदाजांनी केले आहे. त्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघाच्या १० फलंदाजांचा पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
त्यापेक्षाही कमालीची बाब म्हणजे एक अशी व्यक्ती आहे, ज्यांनी क्रिकेट इतिहासातील तीन पैकी दोन वेळा असाधारण क्षणांना आपल्या डोळ्यांपुढे घडताना पाहिले होते.
जिम लॅकर यांनी जेव्हा एका कसोटी सामन्यात १० विकेट हॉलसह १९ विकेट्स घेतल्या होत्या; तेव्हा एक १० वर्षांचा मुलगा ऍशेस मालिकेतील तो सामना पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर ४३ वर्षांनी व जवळपास १४४३ कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेंनी एका डावात १० विकेट्स दिल्ली कसोटीत घेतल्या. यावेळी तो १० वर्षांचा मुलगा ५३ वर्षांचा झाला होता आणि तो हा सामना स्टेडियमवर पाहण्यासाठी उपस्थित होता.
त्या मुलाच नाव आहे ‘रिचर्ड स्टोक्स’. रिचर्ड स्टोक्स हे जर्मनीमध्ये काम करत होते व ते कुंबळेच्या १० विकेट्स विक्रमाच्या वेळी कामानिमित्त भारतात आले होते. विशेष म्हणजे स्टोक्स यांनी जीवनात फक्त दोनचं कसोटी सामने पाहिले होते.
दरम्यान, शनिवारी(४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १० विकेट्स घेतल्या. तो लॅकर आणि कुंबळेनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला. या सामन्यासाठी मात्र रिचर्ड मैदानावर हजर होते की नाही, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नाही.
कसोटीतील एका डावात १० विकेट्स घेणारे गोलंदाज-
जिम लॅकर- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मॅंचेस्टर, १९५६)
अनिल कुंबळे- भारत विरुद्ध पाकिस्तान (दिल्ली, १९९९)
एजाज पटेल – न्यूझीलंड विरुद्ध भारत (मुंबई, २०२१)
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ११० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
साहेबांनी थोपटली पाठ! एजाजच्या पराक्रमाची शरद पवारांकडूनही दखल, मोजकेच शब्द पण पोटभर कौतुक