---Advertisement---

Ind vs Eng: यशस्वी जयस्वालचं अर्धशतक, भारताचा स्कोर 100 पार!

On: बुधवार, जुलै 23, 2025 7:25 PM
---Advertisement---

सलामीवीर यशस्वी जयस्वालने 96 चेंडूत अर्धशतक झळकावले. भारताची धावसंख्या 100 च्या बरोबरीची आहे. दुसऱ्या सत्रात भारताला पहिला धक्का केएल राहुलच्या रूपात बसला, जो 46 च्या वैयक्तिक धावसंख्येवर क्रिस वोक्सचा बळी ठरला. साई सुदर्शन आणि यशस्वी जयस्वाल सध्या क्रीजवर आहे. यशस्वी जयस्वाल आपल्या अर्धशतकाच्या जवळ आहे. तत्पूर्वी, मँचेस्टरमध्ये अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही विकेट न गमावता 78 धावा केल्या.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया तीन बदलांसह मैदानात उतरली आहे. साई सुदर्शनच्या जागी करुण नायरला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त आकाश दीप आणि करून नायर रेड्डी यांच्याऐवजी कंबोज आणि शार्दुलला संधी मिळाली. भारतासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा आहे. त्याचवेळी विरोधी संघ इंग्लंड हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

इंडिया प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कारर्स, जोफ्रा आर्चर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---