मंगळवारी (१३ जुलै) भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. यशपाल शर्मा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १९८३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात त्यांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध ज्याप्रकारे शॉट खेळले होते, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप देताना दिसून येत आहेत.
मॉर्डन डे क्रिकेटमध्ये फलंदाज स्कूप शॉट आणि रिव्हर्स स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, त्या काळात यशपाल शर्मा यांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना जे शॉट मारले होते, ते पाहून आत्ताही सर्वांना आश्चर्य वाटेल यात काही शंका नाही. एक शॉट तर त्यांनी असा खेळला होता, की त्यांनी ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन लेग साईडच्या दिशेने फ्लिक शॉट खेळत षटकार लगावला होता. तो षटकार पाहून नक्कीच इंग्लंडच्या गोलंदाजाचा थरकाप उडाला असेल.
यशपाल शर्मा यांनी या सामन्यात ३ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. होती. त्यांनी मोहिंदर अमरनाथ यांच्यासह ९२ धावांची तर, संदीप शर्मा यांच्याबरोबर ६३ धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे २१४ धावांचे आव्हान भारताला पार करण्यात मोठी मदत झाली होती. हा सामना ६ विकेट्सने जिंकत भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
WATCH: #YashpalSharma’s brilliant batting in the semi-final of 1983 World Cup against England. pic.twitter.com/uZr7k0FpPx
— Madhav Sharma (Modi Ka Parivar) (@HashTagCricket) July 13, 2021
कपिल देव झाले भावूक
जेव्हा यशपाल शर्मा यांच्या मृत्यू झाल्याची बातमी मदनलाल यांना मिळाली, तेव्हा त्यांनी कपिल देव यांना कॉल केला होता. त्यावेळी कपिल देव यांना काहीच माहीत नव्हते. त्यावेळी कपिल देव म्हणाले होते, “मी पाहतो आधी.” त्यानंतर न्यूज चॅनलला मुलाखत दिली असता कपिल देव यांना अश्रू अनावर झाले होते. (Yashpal Sharma brilliant batting in the semi final of 1983)
यशपाल शर्मा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द
यशपाल शर्मा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३७ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांनी ३३.५ च्या सरासरीने १६०६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्यांनी २ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली होते. तसेच ४२ वनडे सामन्यात त्यांनी २८.५ च्या सरासरीने त्यांनी ८८३ धावा केल्या होत्या. यामधे ४ अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशीप २०२१-२३: भारत ‘या’ सहा संघाविरुद्ध करणार दोन हात, पाहा कसे दिले जाणार यंदा गुण
आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मिताली राजला फटका; ‘या’ खेळाडूने गाठले अव्वल स्थान