इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ४७ वा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व सातव्या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान खेळला गेला. ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने उभे केलेले १९० धावांचे आव्हान राजस्थानने यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळ्यांच्या योगदानाने लीलया पेलत शानदार विजय संपादन केला. राजस्थानच्या या पाठलागाचा नायक युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल ठरला. यशस्वीने तुफानी अर्धशतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
मोठा पराक्रम करण्यात ‘यशस्वी’ ठरला जयस्वाल
मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारा यशस्वी या सामन्यात चांगलाच चमकला. त्याने सलामीला उतरताना एविन लुईससह चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी ५.२ षटकात राजस्थानला ७७ धावांची सलामी दिली. २० वर्षीय यशस्वीने २१ चेंडूत ५० धावा काढत राजस्थानच्या विजयाचा मार्ग खुला केला. या अर्धशतकासह त्याच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले.
केली राहुल रैनासारखी कामगिरी
यशस्वीने या सामन्यात पावरप्ले म्हणजेच पहिल्या ६ षटकात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा ठोकण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. चेन्नईच्या सुरेश रैनाने २०१४ मध्ये पंजाब विरुद्ध ८७, पंजाबसाठी केएल राहुलने २०१८ मध्ये ५१ तर, २०१९ मध्ये ५५, वृद्धिमान साहा याने २०१४ मध्ये ५२ व सनी सोहेलने २०११ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर आता अर्धशतक ठोकून यशस्वी या यादीमध्ये सामील झाला आहे.
संघर्षातून पुढे आला यशस्वी
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला यशस्वी मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अत्यंत संघर्षातून पुढे येत त्याने २०२० एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकासाठीच्या संघात प्रवेश केला. तो या स्पर्धेचा मालिकावीर ठरला होता त्यानंतर राजस्थान रॉयल्सने २ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीप्रमाणे फलंदाजी करत असल्याने त्याला अनेक विशेषणे दिली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अबुधाबीमध्ये ऋतु’राज’! आयपीएल २०२१ मधील सर्वात लांब षटकारासह गायकवाडने केले शतक पूर्ण, पाहा व्हिडिओ
शतक एक विक्रम अनेक! ऋतुराजने शतकी खेळी करत ४ मोठ्या विक्रमांना घातली गवसणी
ऋतुराजचा नाद खुळा, आयपीएलमध्ये अशा पद्धतीने शतक पूर्ण करणारा ठरला एकमेव खेळाडू