दरवर्षीप्रमाणे 2024 हे वर्ष देखील क्रिकेट चाहत्यांसाठी खूप आनंदाचे आणि दुःखाचे क्षण घेऊन आले. टीम इंडियाने जूनमध्ये टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे टीम इंडियाचा 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपला. टीम इंडियाला टी20 चॅम्पियन होऊन 4 महिनेही उलटले नव्हते, जेव्हा टीम इंडियाला टेस्टमध्ये इतका वाईट पराभव पत्करावा लागला की लाजिरवाण्या विक्रमांची मालिका रचली गेली. टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 फॉर्मेटला अलविदा केला. या स्पर्धेसोबतच टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. यानंतर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळाला आणि यासोबतच भारतीय क्रिकेटची नवी सुरुवात झाली.
चॅम्पियन झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यांनंतर टीम इंडियाला घरच्या मैदानावर पहिली कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेत टीम इंडियाचा सामना बांगdलादेशशी झाला. ही मालिका जिंकण्यात भारतीय संघाला फारशी अडचण आली नाही आणि बांग्लादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. ही मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. यानंतर सगळ्यांनाच अपेक्षा होती की पुढच्या मालिकेतही न्यूझीलंडविरुद्ध अशीच कामगिरी कामगिरी करेल. पण टीम इंडियाचे सगळे नियोजन फ्लाॅप ठरले जेव्हा न्यूझीलंडने पहिली कसोटी जिंकून संपूर्ण क्रिकेट जगताला चकित केले. घरच्या मैदानावर टीम इंडियाने पहिली कसोटी हरली यावर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही.
बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे 1988 नंतर म्हणजेच 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर पहिला कसोटी सामना जिंकण्यात किवी संघ यशस्वी ठरला. किवी संघाचा भारतीय भूमीवर 37 कसोटी सामन्यांमधील हा केवळ तिसरा विजय ठरला. 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी घसरण झाल्यानंतर टीम इंडिया बदला घेण्यासाठी धगधगत होती पण पुण्यात दुसरा कसोटी सामना सुरू होताच न्यूझीलंडने पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. अखेरीस, न्यूझीलंडने विजयाची नोंद केली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा मोठा पराक्रम केला.
कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत होता. पण किवी संघाने मुंबईचा किल्लाही जिंकून भारताचा 3-0 असा क्लीन स्वीप करून कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. मालिकेत या पराभवासह टीम इंडियाच्या नावावर सर्वात मोठ्या पराभवाचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. घरच्या मैदानावर तीन किंवा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीपचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ होती.
हेही वाचा-
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का, सरावसत्रात केएल राहुल दुखापती
अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली प्रतिक्रिया, फसवणूक प्रकरणाबाबत मोठा खुलासा
13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक