यंदाचे 2024 हे वर्ष भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक संस्मरणीय वर्ष आहे. ज्यामध्ये इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. यावर्षी टीम इंडियाची टी20 इंटरनॅशनलमध्ये एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंची चांगली कामगिरी.
या वर्षी 2024 मध्ये टीम इंडियाने कोणत्याही एका फॉरमॅटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वात जास्त प्रभावित केले असेल तर ते टी20 आहे. ज्यामध्ये भारतीय संघ एकही मालिका गमावला नाही. तर संघाला फक्त 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाची सर्वोत्तम कामगिरी यावर्षी खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात पाहायला मिळाली. ज्यात एकही सामना न गमावता संघाने जेतेपद पटकावले.
मागील वर्षातील 2023 मधील एकदिवसीय विश्वचषकातील पराभव चाहत्यांसह सर्व देशवासीय विसरणार नाहीत. पण यंदाच्या टी20 विश्वचषकातील विजयाने भारतीय चाहत्यांचे दु:ख नक्कीच कमी केले. असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. कारण टीम इंडियाने 2024 ज्या विश्वचषकात जी कामगिरी केली. ते अविश्वसनीय आहेतय संघातील एक ना एक प्रत्येक खेळाडूंना आपले 100 टक्के योगदान दिले. त्यामुळेच भारतीय विश्वविजेता ठरला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेगा स्पर्धेत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना सहज पराभूत करून चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने साखळी फेरीत एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकवेळ हृदयाचे ठोके नक्कीच वाढवले होते. पण सूर्यकुमार यादवने लाँग ऑफवर घेतलेल्या उत्कृष्ट झेलने भारतीय संघाला दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आशाप्रकारे भारताने तब्बल 17 वर्षांनंतर दुसरा टी20 विश्वचषक जिंकला. या मेगा इव्हेंटमध्ये जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कर्णधार रोहित शर्मा यांची कामगिरी पूर्णपणे वेगळ्या पातळीवर पाहायला मिळाली.
यंदाच्या संपूर्ण टी20 विश्वचषकात स्पर्धेत विराट कोहली बॅट शांत होती. पण मात्र फायनलमध्ये विराट कोहलीकडून जबाबदारीची खेळी पाहयला मिळाली. विराट कोहलीने एक टोक राखून शेवट पर्यंत फलंदाजी केली. त्याची ही 76 धावांची खेळी संपूर्ण देशवासीयांना कायम स्मरणात राहील. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या कामगिरीने त्याला या स्पर्धेचे मालिकावीर पुरस्कार मिळाले.
हेही वाचा-
Year Ender 2024; नेमबाजी, हाॅकीपासून बुद्धिबळपर्यंत, या वर्षात खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा वाढवली
लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचे नाव समोर, अटक वॉरंट जारी
“मी दिवसभर त्याच्यासोबत होतो, पण…”, अश्विनच्या निवृत्तीवर जडेजाचे आश्चर्यकारक वक्तव्य!