इंग्लंडची माजी महिला यष्टीरक्षक फलंदाज सारा टेलर ही चांगलीच संतापली आहे. अनेक युजर्स समलैंगिक असल्यामुळे तिची खिल्ली उडवत आहे. अशात आता साराने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. नुकतेच साराने तिची पार्टनर प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. या बातमीमुळे अनेकांना आनंद झाला, तर काहींनी तिला जोरदार ट्रोल करण्यास आणि तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. साराने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एकापाठोपाठ एक ट्वीट करत नेटकऱ्यांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
सारा टेलर (Sarah Taylor) हिने सन 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. सारा टेलर ट्वीट (Sarah Taylor Tweet) करत म्हणाली की, “होय, मी लेस्बियन आहे आणि आनंदी आहे.” सारा तीच खेळाडू आहे, जी मागील काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर विराट कोहली (Virat Kohli) याला प्रपोज केल्यामुळे चर्चेत होती. सारा ट्वीट करत म्हणाली की, “मला माहिती नव्हते की, माझ्या पार्टनरच्या प्रेग्नंसीची बातमी शेअर केल्यानंतर मला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आशा आहे की, काही प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. आयव्हीएफ: एका अनोळखी व्यक्तीकडून दान करण्यात आलेले स्पर्म, जो इतरांना अनोखी संधी देतो.”
Well, I did not anticipate I should have attached an FAQ when announcing my partners pregnancy!
Hopefully I can answer some questions.
IVF: donated sperm from an unknown individual who wants to gift a very unique opportunity to others…
— Sarah Taylor (@Sarah_Taylor30) February 23, 2023
डायना 19 आठवड्यांनंतर देणार बाळाला जन्म
सारा टेलर हिने सोशल मीडियावर पार्टनर डायनासोबत फोटो शेअर करत लिहिले होते की, तिची पार्टनर 19 आठवड्यांनंतर बाळाला जन्म देईल. इंग्लंडची ही खेळाडू इथेच थांबली नाही, तर तिने जे ट्वीट केले त्यात लिहिले की, “होय, मी समलैंगिक (लेस्बियन) आहे आणि दीर्घ काळापासून आहे. हा माझ्यासाठी कोणताही पर्याय नाहीये. माझे तिच्यावर प्रेम आहे आणि मी आनंदी आहे. आम्ही आमच्या बाळाला खूप प्रेम देऊ.”
Yes I am a lesbian, and have been for a very long time. No it's not a choice. I am in love and happy, that's what matters.
Every family is different…how it operates and how it looks. Educate yourself before passing judgement. The baby will be loved and supported…
— Sarah Taylor (@Sarah_Taylor30) February 23, 2023
मानसिक आरोग्याचे कारण देत घेतलेला क्रिकेटमधून ब्रेक
सारा टेलर हिने 2016मध्ये मानसिक आरोग्याचे कारण देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. मात्र, पुढच्याच वर्षी म्हणजे 2017मध्ये तिने विश्वचषकात पुनरागमन केले होते. साराने त्या विश्वचषकात जवळपास 50च्या सरासरीने 396 धावा कुटल्या होत्या. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 147 धावांची सर्वोत्तम खेळीही साकारली होती. (yes i am a lesbian says sarah taylor on social media after partner diana pregnancy announcement read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा