भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी एमएस धोनी आणि विराट कोहलीवर निशाना साधला आहे.
तसेच युवराजच्या निवृत्ती घेण्याबाबत योगराज यांनी भारतीय संघाचे निवडकर्ता सरनदीप सिंग यांच्यावरही निशाना साधला आहे. योगराज यांनी जेव्हाही युवराजबद्दल कोणतीही चर्चा केली आहे, तेव्हा त्यांनी धोनीवर आरोप केले आहेत.
योगराज म्हणाले की, धोनी, विराट आणि सरनदीप (Sarandeep Singh) यांनी युवराजला धोका दिला आहे. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “धोनी आणि विराटबरोबरच निवडकर्त्यांनीही युवराजच्या पाठीत खंजीर खुपसले आहे.”
योगराज यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींबरोबर नुकत्याच झालेल्या भेटीबाबत सांगितले की, ‘मी नुकतीच शास्त्रींची भेट घेतली. मी त्यांनाही असेच म्हणालो की सर्व महान क्रिकेटपटूंना निरोपाचा सामना दिला जावा. मी म्हणालो की जेव्हा धोनी, विराट आणि रोहित क्रिकेटमधून निवृत्ती घेतील, तेव्हा त्यांना आठवण राहिल असा निरोप द्या. कारण त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे.’
निवड समीती सदस्य सरनदी सिंगवरही आरोप करताना योगराज (Yograj Singh) यांनी बीसीसीआयमध्ये अशा लोकांचा समावेश केल्यामुळे बीसीसीआयलाही फटकारले. ते म्हणाले की, “अशा लोकांना निवडकर्ता पद दिले जाते. ज्यांना क्रिकेटची एबीसीडीदेखील माहित नसते. तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आपल्याला दु:ख तेव्हा होते, जेव्हा तुमच्या पाठीत कोणी खंजीर खुपसते.”
युवराजने कॅंसरमधून बरे झाल्यानंतर डिसेंबर २०१२मध्ये पुनरागमन केले होते. परंतु २०१३ नंतर त्याला पुन्हा वनडे संघातून वगळण्यात आले. पण तो २०१४ चा टी२० विश्वचषक खेळला. मात्र तो २०१६ मध्येही टी२० संघाचा भाग होता. मात्र वनडेत २०१३ नंतर त्याने थेट २०१७मध्ये जवळपास ४ वर्षांनंतर पुनरागमन केले होते.
त्याने २०१७ ला कटक येथील वनडे सामन्यात इंग्लंड विरुद्ध १५० धावांची खेळीही केली होती. ही त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. परंतु त्याचा फॉर्म पुढे फार काळ टिकला नाही. काही महिन्यांनंतर त्याची वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड झाली नाही. त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करता आले नाही.
युवराजने नुकेतच म्हटले होते की, नेतृत्वाच्या बाबतीत मला धोनी (MS Dhoni) आणि विराटकडून (Virat Kohli) तेवढा पाठिंबा मिळाला नाही. जेवढा मला भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून (Sourav Ganguly) मिळाला होता.
युवराजने जून २०१९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० कसोटी सामने, ३०४ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ३३.९२ च्या सरासरीने एकूण १९०० धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा केल्या आहेत. तसेच टी२०त त्याने २८.०२च्या सरासरीने एकूण ११७७ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त कसोटीत त्याने ९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, वनडेत १११ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०त २८ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-प्रत्येक ९व्या चेंडूवर ‘हा’ खेळाडू टी२०मध्ये मारतो षटकार, कारकिर्दीत अशी केलीय षटकारांची बरसात
-राजस्थान राॅयल्सची ऑल टाईम ११, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-भारतीय गोलंदाज मागायचे आमची माफी, आम्ही करायचो चांगली धुलाई