युवराज सिंगचे वडील योगराज सिंग त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेक वेळा त्यांची विधाने वादग्रस्त ठरली आहेत. सध्या योगराज सिंग यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते अनेक मोठ्या क्रिकेटपटूंबद्दल बोलले आहेत. या दरम्यान त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, एक वेळ अशी आली होती जेव्हा ते कपिल देव यांना मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या घरी पिस्तूल घेऊन पोहोचले होते. ही घटना कपिल देव यांनी त्यांना भारतीय संघातून वगळलं होतं तेव्हाची आहे.
1980-81 मध्ये भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळणारे योगराज सिंग म्हणाले की, त्यांच्या पत्नीनं त्यांना कपिलला प्रश्न विचारण्यास सांगितलं होतं. एका पॉडकास्टवर चर्चा करताना योगराज यांनी खुलासा केला की, “जेव्हा कपिल देव भारत आणि उत्तर विभागाचे कर्णधार झाले तेव्हा त्यांनी मला कोणतंही कारण नसताना संघातून वगळलं. या गोष्टीचं मला दु:ख झालं होतं. माझ्या पत्नीनं मला कपिलशी बोलावं असं म्हटलं होतं. मग मी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.”
योगराज सिंग म्हणाले, “मी माझी पिस्तूल काढली आणि सेक्टर 9 मधील त्याच्या घरी पोहोचलो. कपिल त्याच्या आईसोबत बाहेर आला. मी त्याला शिवीगाळ केली आणि म्हणालो, ‘तुझ्यामुळे मी माझा मित्र गमावला आहे. तू जे केलं त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मी म्हणालो, ‘मला तुझ्या डोक्यात गोळी मारायची आहे, पण तुझ्या आईमुळे मी ते करणार नाही. यानंतर मी तेथून निघून गेलो.”
योगराज सिंग यांनी पुढे सांगितलं की, कपिल देव यांनी त्यांची माफी मागितली होती. “कपिलनं मला मेसेज केला होता की पुढच्या जन्मात आपण भाऊ असू आणि एकाच आईपासून जन्म घेऊ. पण आजही ते दुःख आणि राग माझ्या हृदयात जिवंत आहे.”, असं .योगराज सिंग म्हणाले.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, डेव्हिड वॉर्नरच्या जागी या खेळाडूची निवड
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी माजी क्रिकेटपटूने निवडला भारतीय संघ, ‘या’ स्टार खेळाडूलाच वगळले
पंजाब किंग्जला मिळाला नवा कर्णधार, सलमान खान करणार घोषणा