पुणे । मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज अरुण वाकणकर मेमोरिअल करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या समीक्षा श्रॉफ हिने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत आगेकूच केली.
एस.पी. कॉलेज टेनिस कोर्ट व मंदार वाकणकर टेनिस अकादमी(एमडब्लूटीए), मुकुंदनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात पुण्याच्या व बिगरमानांकित समीक्षा श्रॉफ हिने सातव्या मानांकित मुंबईच्या परी चव्हाणचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
आदिती लाखेने व्योमा भास्करचा 4-6, 6-2, 6-0असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. अव्वल मानांकित ख़ुशी शर्मा व सोनल पाटील यांनी अनुक्रमे वेदिका माळी व रिशिता अगरवाल यांचा 6-0, 6-0अशा सारख्याच फरकाने पराभव केला.
सहाव्या मानांकित अन्या जेकबचा माही शिंदेवर 6-0, 6-2असा विजय मिळवला.
16वर्षाखालील मुलांच्या गटात आठव्या मानांकित ओंकार अग्निहोत्रीने क्रिश टिपणीसचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(5)असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित सिद्धार्थ जडलीने रघुनंदन आरचे आव्हान 6-4, 6-3असे मोडीत काढले.
प्रणव गाडगीळने ईशान जिगलीचा 6-1, 4-6, 6-1असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुली:
ख़ुशी शर्मा(1)वि.वि.वेदिका माळी 6-0, 6-0;
सोनल पाटील वि.वि.रिशिता अगरवाल 6-0, 6-0;
अन्या जेकब(6)वि.वि.माही शिंदे 6-0, 6-2;
आदिती लाखे वि.वि.व्योमा भास्कर 4-6, 6-2, 6-0;
रुमा गाईकैवारी वि.वि.गौतमी खैरे 6-4, 6-1;
ख़ुशी किंगर(8)वि.वि.एंजल भाटिया 6-3, 6-4;
सायना देशपांडे(5)वि.वि.सानिया मोरे 6-0, 6-1;
मयुखी सेनगुप्ता वि.वि.कांचन चौगुले 6-4, 6-3;
मधुरीमा सावंत(3)वि.वि.श्रावणी खवळे 6-2, 6-2;
समीक्षा श्रॉफ वि.वि.परी चव्हाण(7) 6-2, 6-3;
अग्रिमा तिवारी वि.वि.आस्था खरे 6-2, 7-6(5)
16वर्षाखालील मुले:
सिद्धार्थ जडली(1)वि.वि.रघुनंदन आर 6-4, 6-3;
प्रणव गाडगीळ वि.वि.ईशान जिगली 6-1, 4-6, 6-1;
अभिरव पाटणकर वि.वि.परितोष पवार 4-6, 6-2, 6-3;
प्रसाद इंगळे(5)वि.वि.नमित मिश्रा 6-1, 6-0;
दक्ष अगरवाल(3)वि.वि.अदनान लोखंडवाला 6-2, 6-0;
अनमोल पुरोहित वि.वि.आदित्य सावंत 6-2, 5-7, 6-3;
इंद्रजीत बोराडे(7)वि.वि.अननमय उपाध्याय 6-3, 6-0;
ओंकार अग्निहोत्री(8)वि.वि.क्रिश टिपणीस 6-4, 7-6(5);
अंशूल सातव वि.वि.अथर्व साळूंखेपाटील 6-0, 6-2.