---Advertisement---

जेमतेम १८ वर्षीय मुंबईकर खेळाडूची किया सुपर लीगमध्ये निवड

On: बुधवार, जून 12, 2019 5:16 PM
---Advertisement---

भारतीय महिला संघाची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिगेज यावर्षी किया सुपर लीगमध्ये यॉर्कशायर डायमंड संघाकडून खेळणार आहे. किया सुपर लीगचा अगामी चौथा मोसम असणार आहे.

यॉर्कशायर डायमंड संघाने चौथ्या मोसामात त्यांच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या खेळाडूंच्या यादीत 18 वर्षीय जेमिमाचेही नाव आहे.

जेमिमाच्या आधी किया सुपर लीगमध्ये स्म्रीती मानधना आणि हरमनप्रीत कौर खेळली आहे. तसेच या दोघी चौथ्या मोसमातही या लीगमध्ये खेळणार आहेत. मागीलवर्षी मानधना वेस्टर्न स्ट्रोम आणि हरमनप्रीत कौर लँकाशायर थंडर संघाकडून खेळली होती.

मुंबईची असणाऱ्या जेमिमाने भारतीय महिला संघात मागीलवर्षी 13 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत भारताकडून 10 वनडे आणि 25 टी20 सामने खेळले आहेत.

किया सुपर लीगच्या चौथ्या मोसमाला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे जेमिमा जूलैच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंडला रवाना होईल. तसेच ती या संपूर्ण मोसमात यॉर्कशायर डायमंड संघासाठी उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी आऊट, कोहली कायम

मोठी बातमी – भारताचा हा खेळाडू इंग्लंडला रवाना, घेऊ शकतो शिखर धवनची जागा

शिखर धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयचा मोठा खूलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment