---Advertisement---

हिटमॅन रोहित शर्माने दिले संकेत; हा खेळाडू लवकरच खेळू शकतो टीम इंडियाकडून

On: मंगळवार, सप्टेंबर 15, 2020 2:22 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम (आयपीएल) 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये खेळला जाणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवने 14 सप्टेंबर रोजी आपला 30 वा वाढदिवस साजरा केला.

मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक असलेले माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंग आणि सूर्यकुमार यादव यांचा वाढदिवस 14 सप्टेंबरला होता. या दोघांचा वाढदिवस हॉटेलमध्ये एकत्र साजरा करण्यात आला. या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमार यादव याला वाढदिवसाच्या शुभेच्छासह एक विशेष गोष्ट सांगितली. रोहित म्हणाला की, “तू भारतीय संघात स्थान मिळवण्यापासून फार दूर नाही.”

रोहितने सूर्यकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सांगितले की, ”सूर्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी आशा करतो की, येणारा हंगाम आपल्याला चांगला जाईल. आपण मागील दोन हंगामांपासून चांगले खेळत असून, यंदाही आपला फॉर्म कायम राहिल. मला सांगायचे आहे की, तू भारतीय संघात स्थान मिळवण्यापासून फार दूर नाही.” मर्यादित षटकातील प्रकारात रोहित शर्मा भारताचा उपकर्णधार आहे, त्यामुळे सूर्यकुमारसाठी ही मोठी गोष्ट आहे.

https://www.instagram.com/tv/CFHvo3ZqMf8/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी मुंबई इंडियन्स संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होते.  हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या आणि ईशान किशन यांच्यासह मुंबई इंडियन्सशी संबंधित अनेकांनी सूर्यकुमार आणि रॉबिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनी मिळून केक कापला. रॉबिन सिंग हे बर्‍याच दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा एक भाग आहेत.

सूर्यकुमार मागील दोन हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. सूर्यकुमारने 2018 च्या आयपीएलमध्ये 133.33 च्या स्ट्राईक रेट आणि 36.57 च्या सरासरीने 512 धावा केल्या आहेत, तर  2019 च्या आयपीएलमध्ये 130.86 च्या स्ट्राईक रेटने आणि 32.61 च्या सरासरीने 424 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्वॉटन डी कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नॅथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कुणाल पंड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर  , ख्रिस लिन, हार्दिक पंड्या, शेराफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंग, मोहसिन खान, मिचेल मॅक्लिनेगन, प्रिन्स बलवंत राय सिंग, सुचित रॉय, ईशान किशन.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

-आरसीबीच्या ‘या’ फिरकीपटूला करायची आहे, अंतिम षटकात गोलंदाजी, कारण जाणून थक्क व्हाल…

-मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय

ट्रेंडिंग लेख-

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान

-किंग्ज ११ पंजाब संघाला विजेतेपद जिंकून देण्याची क्षमता ठेवणारे ३ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---