रविवारी(२५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४४ व्या आयपीएल सामन्यात ८ विकेट्सने पराभूत केले आणि या हंगामातील चौथा विजय मिळवला. या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी म्हणाला, चेन्नईच्या खेळाडूंनी शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या.
धोनीचे असे म्हणण्यामागील कारण काय होते असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. पण त्यामागे कारण असे की ज्यावेळी चेन्नईने बेंगलोरला पराभूत केले त्यावेळी गणिती समीकरणानुसार चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा टिकून होत्या. तसेच त्यांच्या आशा अन्य संघांच्या निकालावर अवंलबून होत्या. त्यातही सोमवारी(२६ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यावर सर्वाधिक अवलंबून होत्या.
कारण सध्या चेन्नई गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर कोलकाता १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोलकाताचा एक विजय चेन्नईचे आव्हान संपूष्टात आणणार होता. कारण चेन्नई आता जास्तीत जास्त केवळ १२ गुण मिळवू शकतात.
पण खरंतर गणिती समीकरणांनुसार कोलकाताचा सामना होण्याआधीच रविवारीच झालेल्या ४५ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला ८ विकेट्सने पराभूत केल्यानंतर चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. त्यामुळे अखेर धोनीचे शब्द खरे ठरले आणि १२ तासांच्या आतच चेन्नईचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले.
धोनी बेंगलोर विरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला होता की, “चांगली कामगिरी न केल्याने त्रास होतो. आमचे शेवटचे वेदनादायक १२ तास स्पर्धेत बाकी आहेत. आम्हाला त्याचा पूर्ण आनंद घ्यावा लागेल. आम्ही गुणतालिकेमध्ये कुठे आहोत याचा फरक पडत नाही. ”
तो म्हणाला, “जर आपण क्रिकेटचा आनंद घेत नसलात तर ते क्रूर आणि वेदनादायक असू शकते. माझ्या संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीने मी आनंदी आहे. ”
आता चेन्नईचे साखळी फेरीतील केवळ २ सामने उरले आहेत. या २ सामन्यांचा चेन्नईला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उपयोग होणार नाही. पण कदाचीत गुणतालिकेत शेवटच्या स्थानावरुन थोडे वर येण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या २ सामन्यांपैकी चेन्नईचा एक सामना गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे, तर नंतर रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दसऱ्याच्या मेळ्यातून केली जोरदार शॉपिंग,’ सॅम करनच्या नव्या लूकवर जबरदस्त मिम्स व्हायरल
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
सुर्यकुमार यादवला मिळणार भारतीय संघात संधी? ‘या’ दिवशी होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड
ट्रेंडिंग लेख-
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ